कव्हरेजमुळे ई-पीक नोंदणीची समस्या शेतकरी आहेत अनभिज्ञ

40

कव्हरेजमुळे ई-पीक नोंदणीची समस्या, शेतकरी आहेत अनभिज्ञ

मुल:- शेतक-यांच्या  शेतजमिनीवर लावलेल्या पिकाची नोंदणी आॅनलाईन पध्दतीने थेट शेतात जाऊन स्मार्टफोनच्या आधाराने शेतक-यांनीच  करण्याचे आदेश  शासनाने  दिले आहे.या आदेशाने ग्रामीण शेतकरी वर्गात एकच खडबळ  उडाली आहे.

नोंदण्ीकरीता नो कव्हरेज,नो स्मार्टफोन अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे.गा्रमीण भागात अजूनही इलेक्ट्राॅनिक, इंटरनेेट सुविधा पोहोचल्या नाहीत.अर्थव्यवस्था डबघाईस आली असल्याने ब-याच शेतक-यांकडे स्मार्टफोन नाही.स्मार्टफोन नसल्याने
त्याला हाताळण्याचे ज्ञान नाही. मोबाईलकरिता ग्रामीण भागात लिंक,कव्हरेज सुध्दा नाही.त्यामुळे शासनाच्या  ई-पीक पाहणी अॅपव्दारे नोंदणी समस्येत आली आहे.

ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास 7 दिवस बाकी, शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी महसूल विभाग शेताच्या बांधावर

महाराष्ट्र सरकारनं यावर्षी ई-पीक पाहणी अ‌ॅप सुरु केलं आहे महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे.

माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याचा 15 ऑगस्टला श्री गणेश झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ‌ॅपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ‌अ‌ॅपचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे.

ई पीक पाहणी नोंदवण्यास 7 दिवस बाकी

ई पीक पाहणी अ‌ॅपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी अ‌ॅपमधून नोंदणीची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत.

ई-पीक पाहणी देशाला मार्गदर्शक ठरेल

ई पीक पाहणी अ‌ॅपचं लाँचिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ई-पीक पाहणी अ‌ॅप देशाला मार्गदर्शक ठरेल, असं म्हटलं होतं. आज दररोज हवामानात बदल होतो आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. ई पिक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आनंद आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.