शिक्षण विभागातील वर्ग एक व दोनची पदे पीएच.डी.धारक शिक्षकांमधुन भरावे.

34

शिक्षण विभागातील वर्ग एक व दोनची पदे पीएच.डी.धारक शिक्षकांमधुन भरावे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मागणी केली

 

मूल : जिल्हा परीषद अधिनस्त शाळांमध्ये सेवारत असलेल्या पीएच.डी.धारक शिक्षकांना शालेय शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी पदावर नियुक्ती करून त्यांच्या नियुक्तीने रिक्त होणाऱ्या पदावर पाञताधारक बेरोजगारांना संधी द्यावी. अशी मागणी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंञी, शालेय शिक्षण मंञी आणि ग्राम विकास मंञी यांना पाठविलेल्या निवेदनात संतोषसिंह रावत यांनी
राज्यातील शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षण विस्तार अधिकारी, प्राशासकीय अधिकारी आदी रिक्तपदांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढत आहे.


याचा शैक्षणिक गुणवत्तेवर काही अंशी कां होईना परीणाम पडत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील राज्य शिक्षण सेवा व सामान्य राज्य सेवा प्रशासनातही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. यामूळे राज्यभरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा मोठा खेळखंडोबा सुरू असुन अनेक ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर शिक्षण विभागाचा भार सोपवुन काम केल्या जात आहे. राज्यातील शिक्षण विभागात वर्ग १ आणि २ ची विविध पदे शेकडोच्या संख्येत रिक्त आहेत.
रिक्त असलेल्या महत्वाच्या या विविध पदांवर जि. प. शाळांतील कार्यरत पीएच.डी. धारक शिक्षकांची नियुक्ती केल्यास त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि अनुभवाचा शासनाला मोठ्या प्रमाणात लाभ होवु शकतो शिवाय पिएच.डी. धारक शिक्षकांची वर्ग १ आणि २ मध्ये नियुक्ती केल्यास त्यांच्या नियुक्तीने रिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या पदावर पाञताधारक बेरोजगारांची शिक्षण सेवक म्हणुन काम करण्याची संधी मिळु शकते. शासनाने वर्ग १ व २ च्या रिक्त पदांवर जर पीएच.डी. धारक शिक्षकांना संधी दिल्यास शासनावर आर्थिक भार पडणार नसुन त्याच शिक्षकांमधुन अतिरीक्त ठरलेल्या शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावुन घेता येवु शकेल. पीएच.डी.धारक शिक्षकांना वरच्या पदावर सेवा करण्याची संधी दिल्यास शाळांमध्ये सेवारत असलेल्या इतर शिक्षकांना आपणही उच्च शिक्षित झालो पाहीजे. अशी जिद्द निर्माण होवुन शालेय शिक्षणाची गुणवत्ता आपोआप वाढत जाईल. असा आशावाद संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केला असुन मागणीचा विचार करावा. अशी विनंती केली आहे.