मुसळधार पावसाने नागरिकांच्या घरात शिरले पाणी , नुकसान भरपाई देण्याची मागणी?

69

मुल- आज झालेल्या संततधार वादळी पावसाने दीड ते दोन तास आपला मुक्काम मुल नगरात मांडला होता ३-३० वाजेपासून सुरू झालेला पाऊस 4-०० पर्यंत बरसल्याने वॉर्ड नंबर १५ मधील व नगरातील सर्व रस्ते,नाल्या जलमय झाले असून वार्ड नंबर १५ मधील मारोती भंडारे यांच्या घरात पाणी घुसले तसेच सभोवतालच्या घराच्या दारात पाणी तलावसारखे जमा झाले आहे. चंद्रपूर मुख्य हायवे रस्त्याच्या बाजूने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. हायवे रस्त्याला लागून असलेले अंतर्गत रस्ते बंद झाले आहे वॉर्डातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्मवीर महाविद्यालय पासून तर चरखसंघ आणि गव्हाणकर यांच्या मोकळ्या असलेल्या जागेपासून पाण्याचा लोंढा याच मार्गाने येत असल्याने वासाडे यांच्या घरासमोरील खाली जागेत भरपूर पाणी साचते तोच पाणी नागरिकांच्या घरात घुसत असते.
तसेच विहिरगावच्या पाठीमागे शिक्षक कालनीला लागून असलेल्या झोपडपट्टी मध्ये घराच्या सभोवताल पाणीच पाणी झाले आहे. एकतर घराला लागूनच पाठीमागे विहिरगाव तलाव यावर्षी खोदण्यात आला असून घराला लागूनच खूप उंच पाळ टाकण्यात आली आहे त्यामुळे खूप खोल झालेल्या तलावात आज झालेले पाणी साचले आहे.,झोपडपट्टी मधील काही घरे पाण्याखाली आले तर अनेक घराच्या सभोवताल पाणी साचले आहे. झोपडपट्टी मधील सर्वच रस्ते पाण्याने वेधले आहे. काही नागरिकांना पाण्यामुळे बाहेर निघणे कठीण झाले आहे. जोरदार आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घराच्या सभोवताल पाणी झाले तर काही नागरिकांच्या दरवाज्यातून व घरांतील पाणी भांड्याने फेकण्याची वेळ आली आहे.

 

 

नागरिकांच्या घराच्या सभोवताल साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना साप, विंचू,किडे यापासून भीती निर्माण झाली असून सावध राहने भाग पडले आहे. याबाबत तालूका प्रशासनाने झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांकडे लक्ष देणे गरजेचे झाले असल्याचे दिसून येत आहे.रोड नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत. रोड नाल्या उंच झाल्याने आणि घरे खाली असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी रोड नाल्या बनविले नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. अश्याच परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना नुकसान व त्रास सहन करावा लागत आहे.

विहीरगाव परिसरात शामामुखर्जी वाचनालय ते बौद्ध विहार पर्यंतचा रोड बनविले नसल्याने संजय मेश्राम यांच्या घरात पाणी शिरले.मेश्राम हे मोल मजुरी करून आपला उदर निर्वाह करतात. अश्या परिस्थितीत मुसळधार पाऊसाने घरातील तांदूळ, गहू जगण्याचे साहित्य आणि इतर साहित्य संपूर्ण निस्ताबुज झाले. त्यामुळे आता आमची नुकसान भरपाई कोण करून देणार? असा प्रश्न संजय मेश्राम हे करीत आहेत. संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.