झाडीबोलीला समृध्द करण्यासाठी नवसाहित्यिकांनी पुढे यावे: भोयर

56

 

झाडीबोलीला समृध्द करण्यासाठी नवसाहित्यिकांनी पुढे यावे: भोयर

कवी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या ‘मोरगाड’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

मूल:- झाडीबोली ही चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा व गोंदिया या जिल्हयांतील बोलीभाशा आहे. या बोली भाशेला समृध्द करण्यासाठी नव साहित्यकांनी लेखणीव्दारे दर्जेदार साहित्य लिहून पुढे यावे व झाडीबोलीचा विकास साधावा,असे मनोगत मूल नगरपरिशदेच्या अध्यक्षा व प्रसिध्द कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयरयांनी व्यक्त केले.
झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरच्या वतीने मूल येथे षिक्षकदिनी मूल पंचायत समिती च्या सभागृहात कवी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या ‘मोरगाड‘ या काव्यसंग्रहाचा प्रकाषन सोहळा व झाडी षब्दसाधक षिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळयाच्या उद्घाटक म्हणून त्या मार्गदर्षन करत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचे केंद्रीय सदस्य गा्रमगीताचार्य बंडोपंत बोढेकर हे होते.या प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून राश्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे राश्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनचे अध्यक्ष प्रोफेसर डाॅ.गुरूप्रसाद पाखमोडे होते.

 

प्रमूख अतिथी म्हणून मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डाॅ.मयूर कळसे,सभापती चंदू मारगोनवार,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य सुनील षेरकी,कवी गंगाधर कुनघाडकर,अंधश्रध्दा निर्मूलन समिती गडचिरोलीचे माजी कार्याध्यक्ष विलास निंबोरकर,कवयित्री षषिकला गावतूरे,प्रसिध्द भाश्यकार व जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर,डाॅ.चंद्रकांत लेनगुरे आदी उपस्थित होते.
रत्नमाला भोयर म्हणाल्या,झाडीबोलीतील षब्द हे मनालाआनंद देणारे आहेत.बोली भाशेतील म्हणी,परवलीचे षब्द,सुविचार यांचा वापर करून झाडीबोली टिकविण्यासाठी प्रयत्न करावे.कवी लक्ष्मण खोब्रागडे यांच्याकाव्यसंग्रहात ग्रामीण भागाचे चित्रण आहे.त्यांनी विनोदी षैलीत कविता लिहून झाडीबोलीला समृध्द क्रण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तसेच झाडीबोली साहित्य मंडळ हे समाज जागृतीकरण्याचे प्रयत्न केलेला आहे.तसेच झाडीबोली साहित्य
मंडळ हे समाज जागृती करण्याचे कार्य करीत आहे.त्यामुळेयुवापिढी व महिलांनी पुढे येऊन लिहिते झाले पाहिजे.प्रास्ताविक कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले.यावेळी डाॅ.मयूर कळसे,सभापती चंदू मारगोनवार,
सुनील षेरकी,सत्कारमूर्ती डाॅ.गुरूप्रसाद पाखमोडेयांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांनी झाडीबोलीला साहित्यातसुगीचे दिवस आलेले आहेत. साहित्यात जीवन मूल्ये रूजली पाहिजेत,तसेच झाडीबोली साहित्यकांनी झाडीबोली षब्दकोष निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे,असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान सत्कारमूर्ती डाॅ.गुरूप्रसाद पाकमोडे,बंडोपत बोडेकर व रत्नमाला भोयर यांचा गुरूदेव सेवा मंडळ मूलच्या वतीने षाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व काव्यसंग्रह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच झाडी षब्दसाधक षिक्षक पुरस्कार सुरेष डांगे,डाॅ.सुधीर मोते,मालती सेमले,भाविक सुखदेवे,पंडित लोंढे,पुनाराम निकुरे,दिलीप पाटील,रामकृश्ण चणकापूरे,सरिता गव्हारे,बेनीराम ब्राम्हणकर,सुनील पोटे,प्रषांत भंडारे,संबाषिव गावंडे,प्रदीप मडावी व सुखदेव चैथाले आदी कवींचा षाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान झाडीबोली कविसंमेलन आयोजित करण्यात आले. यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील कवींनी झाडीबोलीतील दर्जेदार कविता सादर केल्या व रसिकांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे संचालन कवी नागेंद्र नेवारे व नेताजी सोयाम यांनी,तर आभार कवी परमानंद जेंगठे यंानी मानले.
कार्यक्रमाच्या यषस्वितेसाठी झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व मूल येथील सर्व कार्यकत्र्यांनी मेहनत घेतली. काव्यसंग्रह प्रकाषन सोहळयाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.