रेल्वेच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू शिक्षकदिनी

30

मुल – रेल्वे रूळावर बसून मोबाईल वर बोलणे ऐका शिक्षकाला चंागलेच माहागात पडले. यात या शिक्षकांचा नाहक जीव गेल. हि घटना शिक्षक दिनाच्या दिवषी रविवारी रात्रौ घडली.मृतक शिक्षकाचे नाव चिरकुटा तुळषीराम खोब्रारागडे वय 45 राहणार मूल असे आहे.
सदर शिक्षक मुल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या उथळपेठ येथील जिल्हा परीशद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी मुल पोलीस स्टेशन मध्ये मर्ग दाखल करण्यात आलेला आहे.

 

काल रात्रौ 9.30 चा सुमारास पंचषील नगर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय चा मागील परीसरात राहणार चिरकुटा तुळषीराम खोब्रारागडे वय 45 वर्श षिक्षक राहणार मुल रात्री जेवण करून फिरण्याकरीता घराचा षेजारून गेलेल्या रेल्वे रूळावर कानामध्ये एअर फोन लावून फोनवर बोलत बसले बोलण्यात ते इतके मग्र झाले होते की,रात्रि चा सुमारास त्याच रेल्वे रूळावर येणा-या रेल्वे ने त्यांना जबर धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला अषी परीसरात चर्चा आहे चिरकुटा तुळषीराम खोबा्रगडे हे उथळ पेठ येथील जिल्हा परिशद शाळेमध्ये मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांच्या पष्चात पत्नी व दोन लहान मुले असून परिसरात  शोककाळ पसरली आहे. पुढील तपास सुरू आहे.