पोंभुर्णा तालुक्यातील विहीर गाव येथील २५ वर्षीय युवक आठ दिवसापासून बेपत्ता

41

पोंभुर्णा: तालुक्यातील विहीर गाव येथील रहिवाशी गणेश रोडे वय २५ वर्ष हा व्यक्ती गोंडपीपरी मधील संदीप हॉटेल मध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता.त्याचे चंद्रपुर येथील शीतल नावाच्या मुलीशी एक वर्षापूर्वी लग्न झाले.लग्नाच्या काही वर्षातच दोघांत काही गोष्टींना घेऊन अन बन सुरू झाली.छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन रोज भांडणे होऊ लागली.या जाचाला कंटाळून दोघे एकमेकांपासून अलिप्त राहायला लागले.त्याला सोडून ती चंद्रपूर आपल्या माहेरी राहू लागली आणि हा आधी चंद्रपूर त्यानंतर गोंडपिपरी येथील संदीप हॉटेल मध्ये स्वयंपाकी म्हणून काम करू लागला. एक महिना काम करून चंद्रपूरला जातो असे सांगून सोमवार दिनांक २३ ऑगस्ट ला मालकाकडून महिन्याचा पूर्ण वेतन घेऊन बाहेर पडला.त्या दिवसापासून तो बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती कुटुंबियांकडून मिळाली.

अधिक प्राप्त माहिती नुसार मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी गणेश रोडे ची पत्नी शीतल वय २० वर्ष हीचा गणेश च्या भावाला फोन आला.तिने फोन वर सांगितले की,तुमच्या भावाचा मृत्यू झाला असे ऐकताच गणेशच्या कुटुंबियांच्या पायाखलील जमीन सरकली.बातमी ने कुटुंबात शोककळा पसरली,पण गणेश मृत्यू पावला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.या गोष्टीची शहनिष्या करण्यासाठी सर्व जण चंद्रपूरला बाबुपेथ येथे शीतल च्या घरी येऊन ठेपले.घरी आल्यावर वेगळेच दृष्य समोर आले.शीतल घरी नव्हती आणि नाही कोणता प्रेत समोर होता.शीतल बद्दल तिच्या कुटुंबीयांना विचारणा केली असता ती बाहेर गावी गेली आहे असे सांगण्यात आले.फोन वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बंद दाखविला जात आहे.या रहाष्यामागे काय तथ्य लपला आहे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हत तेव्हा गणेश च्या कुटुंबीयांनी उमारी पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेली सारी कहाणी ठाणेदार कुकडे यांना सांगितले.त्यावर त्यांनी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले करण गणेश गोंडपिपरी मधून बेपत्ता झाला असे त्यांचे म्हणणे होते.ठाणेदार कुकडे यांच्या सांगण्यावरून कुटुंबीयांनी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यापूर्वी आसपासच्या परिसरात शोध घेतला असता गणेश चा कोठेही थांगपत्ता लागू शकला नाही. पोलीस ठाणे येथे लेखी तक्रारीत सदर फिर्यादीत व्यक्तीचे वर्णन करण्यात आले असून पोलीस ठाण्यातं मिसिंग केस दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजगुरू हे करीत आहेत.