कॅन्सरग्रस्त रुग्णाला CDCC बँकेने दिला आधार

44

मुल-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या गंभीर रूग्णांना,शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम करीत असून निराधार रुग्णांना बँकेचा आधार देण्याचे काम बँक करीत असून मुल तालुक्यातील बोनडाला येथील अल्पभूधारक शेतकरी विजय गिरमाजी फाले यांच्याकडे दिनांक १/९/२०२१ रोजी रुग्णांच्या घरी जाऊन त्याची प्रत्यक्ष विचारपूस करुन सरपंच व ग्रामस्थांसमोर उपचारासाठी चाळीस हजार (४००००/-) रुपयांचा चेक रुग्णाची पत्नी सौ. शलुताई फाले यांना अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिला. CDCC BANK CHANDRAPUR

याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, गुरु गुरनुले , सरपंच जालिंदर बांगरे, माजी सरपंच योगेश शेरकी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निलेश बांगरे, विकास आलेवार, गोविंदा बांगरे, भाऊराव फाले यांचेसह अनेक गावकरी व गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. कँसर ग्रस्त असलेल्या रुग्णाला CDCC बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून घरी येऊन तात्काळ मदत दिल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे सरपंच व गावकऱ्यांनी आभार मानले आहे.