धर्मजागरण समिती मूलच्या वतीने मूल पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम

43

धर्मजागरण समितीतर्फे रक्षाबंधन
मूल:- धर्मजागरण समिती मूलच्या वतीने मूल पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
पोलीस बांधव नेहमीच आपले रक्षण करतात. त्यांचे ऋण कधीही फेडू शकत नाही.आपल्या बांधवांसारखे आपली रक्षा करतात.त्यासाठी पोलीस बांधवांना आज धर्मजागरणच्या भगिर्णीमार्फत राखी बांधण्यात आली.
मूल पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजपूत,एपीआय ठवरे,राठोड तसेच सर्व पोलीस बांधव यावेळी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक राजपूत यांनी धर्मजागरणच्या भगिणींशी संवाद साधला.

कार्यक्रमाची प्रस्तावना किरण कापगतेयांनी केले.याप्रसंगी धर्मजागरण समितीच्या प्रा.डाॅ.किरण कापगते,रोहिणी घरोटे,संध्या कवासे,गानलावर,सुनीता बोलीवार,सुचिता बुक्कावार,चेतना मोहूुर्ले,चैहान तसेच महिलांची उपस्थिती होती.