Diploma Admissions: DTE नं वाढवली डिप्लोमासाठी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख; असं करू शकता अप्लाय

54

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (MSBTE) नं DTE महाराष्ट्र प्रवेश 2021 (DTE Maharashtra Admission 2021) साठी रजिस्ट्रेशन (How to register for DTE Maharashtra Admission 2021) करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. SSC आणि HSC या दोन्ही डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या नोंदणीची (Registration for diploma courses) तारीख आता 3 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जे विद्यार्थी यासाठी रजिस्ट्रेशन करू इच्छितात ते DTE महाराष्ट्राच्या अधिकृत (DTE Maharashtra) साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. 3 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रवेशासाठी कागदपत्रं पडताळणी आणि अर्जाची पुष्टी देखील केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय विद्यार्थी / जम्मू -काश्मीर आणि लडाख स्थलांतरित उमेदवारांसाठी पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List of Diploma) 5 सप्टेंबर 2021 रोजी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहे.

तसंच HSC डिप्लोमासाठी अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit Lists) 8 सप्टेंबर रोजी आणि SSC डिप्लोमासाठी 9 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठीची शेवटची तारीख वाढवण्यासंबंधीची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी ट्विटरवरून दिली आहे. “प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी ( दहावी नंतरच्या ) तसेच प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र (बारावी नंतरच्या ) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात येत असून सुधारित अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ अशी आहे.” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://www.dtemaharashtra.gov.in/index.html या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. तसंच कागदपत्रं आणि इतर पडताळणी नंतरच रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होणार आहे.