गणेशोत्सव, दुर्गा व शारदोत्सवासाठी दान देणगी गोळा करण्यास परवानगी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाद्वारे

49

महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ क अन्वये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाद्वारे गणेशोत्सव, दुर्गा व शारदा उत्सवासाठी दान देणगी गोळा करून तात्पुरत्या स्वरूपात उत्सव साजरा करण्यासाठी अर्जदार मंडळाकडून ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारण्यात येत आहे. याबाबत www.charity.maharashtra.gov.in या धर्मदाय संघटनेच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्ज भरण्याकरीता अत्यावश्यक बाबी व दस्तऐवज:

अर्ज परिपूर्ण भरलेला असणे आवश्यक आहे. मूळ ठरावाची सर्व सभासदांची स्वाक्षरी असलेली प्रत असणे आवश्यक, संबंधित महानगरपालिका नगरपरिषद ग्रामपंचायत यांचे जागेचे ना हरकत प्रमाणपत्र, विद्युत बिलाची झेरॉक्स प्रत, सर्व सभासदांचे पॅनकार्ड, आधार कार्ड, मागील वर्षाची परवानगीची प्रत, रुपये १०० च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, तसेच मागील वर्षाचा हिशोब देणे आवश्यक, मंडळाचे मागील वर्षाचे उत्पन्न रुपये ५ हजार पेक्षा जास्त असल्यास अंकेक्षण अहवाल अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज ऑनलाइन भरतेवेळी आवश्यक व बंधनकारक सर्व दस्तऐवज स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच कोविड-१९ संदर्भात जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेले आवश्यक सर्व दिशानिर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील, असे सहाय्यक धर्मदाय आयुक्त सी.एम. ढबाले यांनी कळविले आहे.