25 व 26 आॅगस्टला आॅनलाईन रोजगार मेळावा

40

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंन्द्राव्दारे 25 व 26 आॅगस्ट रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय आॅनलाईन रोजगार मेळावा व वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुकांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.


उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वताची नाव नोंदणी करावी किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोदंणी केली असेल त्या उमेदवारांनी डब्लू डब्लू डब्लू डॉट महास्वयंमडॉट जिओव्ही ईन या संकेतस्थळावर नोंदणी करून पासवर्डने लॉगिन करावे .आपल्या होम पेजवरील पंडित दीनदयाल उपाध्याय आॅनलाईन जॉब फेअर हा पर्याय ​निवडावा. वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या उद्योजकंाच्या रिक्त पदाकरिता सहभागी होता येणार आहे.