महीलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याचा प्रयत्न,अन् त्याने स्वसंरक्षणासाठी तलावात उडी घेतली

41

मूल (प्रतिनिधी)
लोक मारतील या भितीपोटी घाबरलेल्या एका युवकाने जीव वाचविण्यासाठी पाण्याने तुडूंब भरलेल्या तलावात उडी घेतल्याची घटना मूल येथे घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील  डाखरे (२३) दुपारी ३.३० वा. चे सुमारास कामानिमित्य चंद्रपूर वरून गडचिरोली कडे बसने जात होता. दरम्यान खाण्यासाठी शेंगदाणे घेण्याकरीता मूल बस स्थानकावर उतरला असता तो ज्या बसने प्रवास करीत होता ती बस निघुन गेली. त्यामूळे तो दुसऱ्या बसने गडचिरोली जाण्याचा प्रयत्नात होता, परंतु खिशात मोजकेच पैसे असल्याने गडचिरोली जायचे कसे ? या विवंचनेत असतांना त्याने दुसऱ्या बस मध्ये बसतांना एका महीलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांच्या सतर्कतेमूळे त्याचा चैन चोरण्याचा प्रयत्न फसला. पकडल्या गेल्याने आता लोक मारल्याशिवाय राहणार नाही. अशी भिती वाटु लागल्याने लोकांच्या मारापासुन जीव वाचविण्यासाठी म्हणुन त्याने बस स्थानकाला लागुनच असलेल्या पाण्याने तुडूंब भरलेल्या तलावात उडी घेतली. दुरवर पोहत जावुन छाती एवढ्या पाण्यात उभा राहीला. सदर प्रकाराची माहीती पोलीसांना होताच पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड, पोहेकाँ बावणे, मुंढरे, शफीक, वाहतुक शिपाई नैताम आदी घटनास्थळी पोहोचले. छातीभर पाण्यात उभ्या असलेल्या मंगेशला बाहेर येण्यासाठी विनवनी करू लागले. परंतु मारण्याच्या भितीने मंगेश बाहेर येण्यास नकार देत होता. त्यामुळे पोलीसांनी वेगळ्या भाषेत समजावुन सांगत न मारण्याची ग्वाही दिल्यानंतर तो बाहेर निघाला. पोलीसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणले परंतु ज्या महीलेची चैन चोरून नेण्याचा आड मंगेशवर घेण्यात आला ती महीला पुढे निघुन गेली, त्यामुळे चोरीच्या फिर्यादी अभावी पोलीसांना मंगेश डाखरे विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करता आला नाही परंतु त्याचे विरूध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली.