रोग प्रतिकार शक्तीसाठी रानभाज्य उपयुक्त.पिपरी दिक्षीत येथील ग्रामपंचायत कार्यालयातील परिसरात

35

मूल :—
रोजच्या सकस आहारात मानवाची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रानभाज्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रानभाज्य उपयुक्त असून आहारात समावेश केल्याने आरोग्य संपन्न राहता येईल. तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)यांच्या संयुक्तवीने
पिपरी दिक्षीत येथील ग्रामपंचायत कार्यालयातील परिसरात रानभाज्य महोत्सवाचे समारोपीय कार्यक्रम पार पाडले.
या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन सरपंच सौ उरकुडे यांचे हस्ते करण्यात आले.तालुक्यात पावसाळयात सुरूवातीला रानभाज्या जंगलात व शेतशिवारात उगवतात. या रानभाज्यांची चव व औषधी गुण वेगळेच असते. या रानभाज्यांची ओळख व महत्व लक्षात घेता परिसरातील नागरीकांनी राणभाज्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.यावेळी कार्यालया तर्फे स्टॉल लावुन राणभाज्यांची औषधी महत्व पटवून देण्यात आले.या महोत्सवात अकु,केना,आवळा,करटोले,गुडवेल,धोपा,तटुशेंगा,राजगीरा,वास्ते,कारली धानभाजी,कडूभाजी,सुरण,गोफण भाजी,अंबाडी, तरोटा इत्यादी पैाष्टीक
तसेच औषधीयुक्त भाज्या शेतक—यांनी आणुन विक्री केल्या.


9आॅगस्ट ते 15 आॅगस्ट पर्यंत चाललेल्या या रानभाजी महोत्सवाचे समारोपीय कार्यक्रम मौजा पिपरी दिक्षीत येथे पार पडले.
या प्रसंगी प्रमूख पाहून उपस्थितीत सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले पदाधिकारी सरपंच सौ. श्वेताताई उरकुडे ,म.क्रु.अ.मा. श्री. तिजारे साहेब्,क्रु.प्.श्री.पराते साहेब्,उपसरपंच देवराव पिपरे,क्रु.स्.आर आर पाटील,श्री.पि.बि.खिल्लारी श्री.पाटबाजे ,कु.एस.डी.खिल्लारे,कु.व्हि.टी.मानकर,कु.एन.बि.उईके ,क्रु.मित्र विशाल टेकाम,ग्रामसेवक श्री.आकाश कळमकर,शिक्षक शंकर चिंचघरे,त.मु.अ. महादेव पाल,ई. अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.उपसरपंच,शिक्षक,सचिव,तिजारे साहेब,कृषि पर्यवेक्षक,कृषि सेवक हजर होते.रानभाज्या आरोग्याच्या दुष्टीने मोठे महत्व असून अनेक रोगावर राणभाज्या गुणकारी असून यात अनेक जिवनसत्व असल्याचे ग्रामस्थंानी जाणुन घेतले.