विज पडून दोन शेतक—यांचा मृत्यू वेळगाव येथील घटना

44
गोंडपीपरी – खरीप हंगाम सद्यस्थितीत सूरू आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज दुपारच्या सुमारास मेघ गर्जनेसाह पावसाला सुरूवात झाली. अशात वीज कोसळल्याने शेतात काम करीत असताना दोघांना जीव गमावावा लागला. ही घटना गोंडपिपरी तालुक्यांतील वेळगाव येथे घडली असुन,रेखाबाई अरुण घुबडे वय 34,मारोती चौधरी वय 36 रा. वेळगाव असे मृत व्यक्तींची नावे आहेत. 
वेडगाव येथील लक्ष्मीकांत कलपल्लीवार यांच्या शेतात कामावर असताना अचानक विज पडली त्यात रेखाबाई घुबडे ,मारोती चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
झालेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतक रेखाबाई घुबडे यांच्या पश्चात दोन मुले आहे. मारोती चौधरी यांच्या पश्चात देखील दोन मुले आहेत.