जुन्या वस्तीमधील समस्या बदल वीधीमंडळ लोकलेखा समीतीचे अध्यक्ष, माजी अर्थमंत्री व वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन

31

जुन्या वस्तीमधील समस्या बदल वीधीमंडळ लोकलेखा समीतीचे अध्यक्ष, माजी अर्थमंत्री व वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन
मूल :— शहरातील जुन्या वस्तीमधील समस्या मागील 25 वर्षापासून वार्डातील रोडचे काम अजून पर्यंत पुर्ण झालेले नाही जाण्यासाठी मार्ग नाही खुल्या प्लॉटवरून जाणे येणे सुरू आहे भाऊ तुम्ही आम्हाच्या रोड साठी निधी दिली ति निधी आलेली असून बांधकाम अर्धवट झालेला आहे.रोड पूर्ण करण्यासाठी मध्यामध्ये अतिक्रमण असल्यामुळे तिथून नागरीकांना जाण्याकरीता येण्याकरीता मार्ग निघत नसल्यामुळे रोड चे काम बंद ठेवण्यात आलेले आहे.
मौजा मूल लगतच्या सर्वे नंबर 947,948 जागेलगत सर्वे नंबर 953 व 938 मधून वार्ड क्र 12 मधील सार्वजनिक रस्ताला जोडणारा सार्वजनिक रस्ता रहदारी व वाहतूकीकरीता सुरू करून देण्यात यावा. सर्वेनंबर 953 व 938 या जागेतून 4 मीटर रूंदी व 35 मीटर पूर्व पश्चिम लांबीचा गांधी चौक ते विश्रामगृह रोड पर्यंत सार्वजनिक वहीवाटीसाठी सावर्जनिक रस्ता आहे तरी सुध्दा मार्ग निघालेला नाही.
जुन्या वस्ती मधील नागरीकांना जाण्या येण्याकरीता मार्ग काढण्याकरीता नगरपरीषद मूल मूख्याधिकारी,अध्यक्षा यांना कळविण्यात येवून सरळ रस्ता काढून देण्याकरीता सामाजिक कार्यकर्ता युवराज घोसेकर वार्ड नंबर 12 मधील युवकांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.