वाहनाच्या धडकेत बिबट ठार

26

वरोरा भद्रावती मार्गावरील टोलनाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणा—या बिबटयास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा आठच्या सुमरास घडली.

 

या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांना मिळताच आपल्या चमुसह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता नेण्यात आले. बिबटचे वय व कोणत्या प्रजातीचा आहे हे मात्र वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नाही. पुढील तपास वनविभाग करीत आहे.