व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी अर्जास मुदतवाढ 12 ते 16 ऑगस्टदरम्यान

29

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी अर्जास 12 ते 16 ऑगस्टदरम्यान मुदतवाढ दिली आहे. एवढेच नव्हे, तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांनाही अर्जात दुरुस्ती करण्याची संधी राज्य सीईटी सेलने उपलब्ध करून दिली आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, एमबीए, एमसीए, मास्टर ऑप ऑर्किटेक्‍चर, पदवी आणि पदव्युत्तर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज मागवले होते.

मात्र, ‘सीईटी’साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले नाहीत. तसेच अपूर्ण अर्ज भरलेले आहेत व काही विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले नाही अशांना आता अर्ज करता येणार आहे.

त्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या अर्जामध्ये विद्यार्थ्यांना आपले पूर्ण नाव, स्वाक्षरी, फोटो आणि परीक्षा केंद्रामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अंतिम संधी दि. 14 ते 16 ऑगस्टदरम्यान देण्यात येत आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली.