सावधान ! मुल शहरात चोरांचा सुळसुळाट,नागरिकांमध्ये घबराट भुरट्या चोरांचा बंदोबस्त करा – व्यापारी असोसिएशनचे निवेदन

43

 

भुरट्या चोरांचा बंदोबस्त करा – व्यापारी असोसिएशनचे निवेदन

मुल – पोलीसांच्या डोळयात धुळ झोकुन अज्ञात चोरांनी शहरात धुमाकुळ माजवला आहे. मागील काही दिवसांपासून शहराच्या अनेक भागात चोरांनी हात साफ केल्याने नागरीकांमध्यें भितीचे वातावरण पसरले असून पोलीसांनी रात्रोची गस्त वाढवावी. अशी मागणी मुल जनरल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोती तहलियानी यांनी लेखी निवेदनाद्वारे पोलीस उपविभागीय अधिकारी अनुज तारे यांच्या मार्फतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात उद्भवलेली बेरोजगारी आणि आर्थिक समस्यांमूळे चोरीचे प्रमाण वाढेल असून वार्ड न.१५ मधील श्री.भुस्कुडे यांची फॉर व्हीलर गाडी नुकतीच चोरीला गेली. तालुक्यातील उश्रला, करवंन काटवन गावात घरी बांधून असलेल्या शेळ्या-मेंढ्या चोरीला गेल्या. ११.८.२०२१ रोजी बस स्थानक समोर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सचे जॅक चोरून नेतांना चालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे चोर सापडला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले. आणि राजोली येथील गजानन वलकेवार यांच्या अंगणातून १२.८.२०२१ ला दोन दुचाकी वाहन चोरीला गेले. मागील एक महिन्यांपूर्वी मुख्य रस्त्यावरून ट्रक चोरीला गेला त्याला पकडण्यात पोलिसांना लगेच यश आले. एवढेच नव्हेतर रात्रीच्या वेळेला घरासमोर किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्यामधून पेट्रोल-डिझेल सुद्धा मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याची चर्चा गावात केली जात आहे. अशी चोराची दहशत असतांना कुठेतरी पोलिसांचा बंदोबस्त गस्त कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. महिण्याभरापासुन शहरात सुरू झालेल्या चोरीच्या घटनांनी नागरीकांनी चांगलाच धसका घेतला आहे. शहराच्या अनेक भागातील घरांमध्यें तर काही दुकानांमध्यें रात्रोचा अंधार आणि पोलीसांची गस्त होत नसल्याने तर काही घरांना कुलुप लागल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करून आजपर्यत लाखोचा ऐवज लंपास केला आहे. होत असलेल्या चो-या भुरटया स्वरूपाच्या होत असून कधी सायकल तर कधी मोटार सायकल, कधी पेट्रोल तर कधी डिझेल, कधी दागीने तर कधी नगदी रूपये, नाहीच काही सापडले तर गायी, बक-या, आलमारीतील कपडे, मोटार पंप, मोठ्या वाहनामधुन जाँक व लोखंडी सामान चोरी जाण्याच्या किरकोळ घटना घडत असल्याने नागरीक पोलीसात तक्रार नोंदविण्याच्या भानगडीत पडतांना दिसत नाही. त्यामुळे व्यापारी वर्गात देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. करिता पांच्यायत समिती मागील भागात, गांधीचौक ते सोमनाथ रोड, विश्राम गृह ते विहिरगाव, मुख्य रस्ता टोपाझ बार पर्यंत, कृषी उत्पन्न बाजार समिती ते ताडाला रोड, रेल्वे स्टेशन रोड, इत्यादी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त रात्रीची गस्त तात्काळ लावावी अशीही मागणी करण्यात आली आहे.चोरीच्या लेखी तक्रारी होत नसल्याने शहरात सर्व काही आँल इज वेल समजून पोलीस प्रशासनाची नेहमीची गस्त नियमित सुरू आहे. पोलीस प्रशासनाची वाहनाद्वारे नेहमीची गस्त सुरू असली तरी पोलीसांच्या डोळयात धुळ झोकुन अनेक भुरटे चोर अनेकांच्या घरी, दुकानात व पानठेल्यावर हात साफ करीत आहेत. पोलीसांची गस्त सुरू असतांनाही चोरटे संधी साधून चोरी करीत असल्याने पोलीसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. काल राजोली येथे दोन दुचाकी चोरीस गेल्या तर काही दिवसांपूर्वी मुख्य मार्गावरून उभा ट्रक आणि घरासमोर उभी असलेली होंडा शाईन दिवासाढवळ्या चोरटयांनी पळवुन नेली. चार दिवसांपूर्वी शहराच्या वार्ड नं. १६ मधून सायकल तर आठवडयाभरापूर्वी दरवाजा फोडून घरात ठेवलेले ३५ हजार रूपये लंपास केले. आणि वार्ड नंबर १४ मध्ये पंचायत समिती मागील भागात रात्रौ २ च्या सुमारास अनेक नागरिक गाढ झोपेत असतांना दार ठोठावण्यात आल्याचे सांगितले आहे त्यामुळे चोराच्या दहशतीमुळे अनेक नागरिकांची झोप उडाली आहे.