मुल येथे पथविक्रेत्यांना मिळाली ‘नवसंजीवनी’ प्रधानमंत्री स्वनिधी ​योजना : लाभाथ्र्याना हजारोचे कर्ज वाटप

64

मूल :— कोरोना रोगाच्या संकटात संरक्षणाचा एक भाग म्हणुन संपुर्ण देशात लॉकडाउुन संचारबंदी करण्यात आली होती.त्याचा मोठा विपरीत परिणाम देशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेवर तर झालाच मात्र सर्वसामान्य नागरीकांवर सुध्दा दिसुन आला.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हाताचे काम गेले तर काहींना नाईलाजास्त जिवासाठी स्वत:चे काम सोडावे लागले.मुल शहरामध्ये हातावर पोट असलेल्या पथविक्रेत्यांना तर लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला. पथविक्रेत्यांना लॉकडाऊन मध्ये घरातच राहावे लागले. अशा अनेक घटकांचा पोटापाण्याचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही.

मात्र केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना दिलासा मिळाला असून ही योजना ‘नवसंजीवनी’ ठरीत असल्याचे चित्र सध्या मुल शहरामध्ये दिसून येत आहे.पथविक्रेता सहाय अभियानअंतर्गत ‘आर्थीक सक्षमीकरण ….पथविक्रेत्यांचे सबलीकरण करण्यासाठी ही योजना राबविली जात असून आजघडीला मुल शहरातील पथविक्रेत्यांनी या योजनेकरीता आवेदन अर्ज सादर केले असून प्रत्येकी 10 हजार रूपये अशा जवळपास हजरोपेक्षा अधिक लाभथ्र्यांना एकूण हजार रूपयांचे कर्ज मंजुर करून सदर रक्कम लाभाथ्र्यांच्या बॅंक खात्यामध्ये वळती करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत मुल शहरातील लाभाथ्र्यानाी अर्ज सादर केले असुन लाभाथ्र्याना या योजनेंअतर्गत रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.