अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

29

चंद्रपूर :-  जिल्ह्यातील मातंग समाजातील १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २0२0-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १0 वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकीकरिता महामंडळाकडून सरासरी ६0 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, पासपोर्ट फोटो, मार्कशीट, टी.सी., रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज आदी दोन प्रतीत सर्व मूळ कागदपत्रांसह

१२ ऑगस्ट २0२१ च्या आत कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.