निधन वार्ता

31

निधन वार्ता
सिंधुताई रेकलवार
मूल: तालुका पत्रकार संघाचे माजी सचिव, ज्येष्ठ पत्रकार तथा कवठी येथील शहीद सुरकर विद्यालयाचे शिक्षक विनायक रेकलवार आणि जनता विद्यालय पोेंभुर्णा येथील शिक्षक गजानन रेकलवार यांच्या मातोश्री सिंधुताई ओमाजी रेकलवार (७९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मूल, दोन मूली, स्नुषा, नातवंड आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांचेवर येथील मोक्षधामावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी समाज बांधव आणि आप्तस्वकियांची उपस्थिती होती.

निधन वार्ता
कमल सोनुलवार
मूल: येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा बेलदार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुरावजी सोनुलवार यांच्या सहचारीणी सौ. कमलबाई सोनुलवार यांचे वार्धक्याने नुकतेच निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या, त्यांचे पश्चात पती, एक मूलगा आणि सात मूली व बराच मोठा परिवार आहे. त्यांचेवर स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोनुलवार यांचे आप्तस्वकिय आणि समाज बांधव उपस्थित होते.

निधन वार्ता
जया केवळराम ऊईके
मूल: येथील पोलीस कर्मचारी केवळराम उईके यांची कन्या जया केवळराम उईके (19) हीचे अल्प आजाराने निधन झाले. स्व. जया ही चंद्रपूर येथील इनसाईड इन्स्टीटयुट येथे वैद्यकिय शिक्षणासाठी निट ची तयारी करीत होती. कावीळ आजाराने ग्रस्त असलेली जया अत्यंत हुशार आणि मनमिळावु होती. तिच्या अकाली निधनाने उईके परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तिचेवर स्थानिक उमा नदीकाठावर अंत्यसंस्कार करण्यांत आले. तिचे पश्चात आई वडील, दोन बहिणी आणि मोठा परिवार आहे.