पाच मिनिटात उघडता येते पोस्ट पेमेंट बॅंकेचे खाते, गरोदर मातांसाठी वरदान

75

पाच मिनिटात उघडता येते   पोस्ट पेमेंट बॅंकेचे खाते   गरोदर मातांसाठी वरदान

प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये 1 जानेवारी 2017 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत 1 जानेवारी 2017 रोजी अथवा तद्ननंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असल्यास शासनाच्या अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी नोंदणी केली असल्यास मातृ वंदन योजनेंतर्गत पात्र लाभाथ्यांना 5000 चा लाभ त्यांचे आधार संलग्र बॅंक खात्यावर देण्यात येतो.

मात्र बॅंकांच्या वारंवार चकरा मारूनही नाव बदलासह इतर काही कारणामुळे योजनेचा लाभ घेण्यात महिलांना अडचणी येत होत्या. यावर इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेचे आॅनलाईन खाते गरोदर मतांासाठी वरदान ठरत आहे.

पोस्टाचे हे खाते आपल्या आधार कार्ड आणि बायोमॅट्रि​कने अतिशय जलद केवळ 5 मिनिटात पेपरलेस पध्दतीने उघडले जाते.
खाते नि:शुल्क असून त्यासोबत क्यआर कोड मिळते ज्याने ग्राहक व्यवहार करू शकतात.

 

तसेच या खात्यामुळे आधार सिडिंग एकदम परिपूर्ण रीत्या शक्य होते.जर आधार अपडेटेड असेल तर मातांचे लग्रानंतरचे नाव बॅंकेत आधी असलेल्या खात्यात अगदी 2 मिनिटात आॅनलाईन बदलता येते.

                          विशेष म्हणजे या पोस्ट बॅंकेत पूर्ण भारतभर एकच आयएफसी कोड असल्यामुळे ग्राहकांची दमछाक होत नाही.
बॅंकतील मोबाईल बॅंक अप अतिशय जलद अन्य काही सुविधा या बॅंक खात्यातून पूरविल्या जातात.यामुळे महिलांचा सहभाग वाढत आहे.