Link PAN with Aadhar | SBI चा ग्राहकांना इशारा ! ‘या’ तारखेपर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करून घ्या, अन्यथा.

93

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Link pan with Aadhar | भारतातील सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सुविधा देत असते. डिजिटल मार्केटच्या जगात आता बँक देखील डिजिटलला अधिक प्राधान्य देत आहेत. याचप्रमाणे आता SBI बँकेनं ग्राहकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ग्राहकांना बँकेच्या व्यवहारामध्ये कोणतीही समस्या येऊ नये यासाठी SBI ने ग्राहकांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड (Link pan with Aadhar) लिंक करून घ्यावं असा सल्ला आम्ही त्यांना देत आहोत.’ याबाबत माहिती SBI बँकेनं ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

आधार कार्ड (Aadhar card) आणि पॅन कार्ड (PAN Card) लिंक करण्यासंबंधी काही महत्त्वाची माहिती बँकेनं दिली आहे.
पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhar card) लिंक केले नसल्यास ग्राहकांना अडचणी निर्माण होऊ शकतात.
त्यासाठी ग्राहकांनी सप्टेंबरच्या आत लिंक करणे आवश्यक असल्याचं सांगितलं आहे.

द्यावा लागणार इतका दंड –

30 सप्टेंबर 2021 ही तारीख अंतिम आहे. त्या आधी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. 30 सप्टेंबर आधी लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड अवैध ठरेल आणि त्यामुळे तुम्हाला दंड भरून त्याची वैधता सुरू करून घ्यावी लागणार आहे.

कसं कराल लिंक?

– आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्सच्या नव्या https://www.incometax.gov.in/iec/foportal वेबसाइटवर जा.

– त्यानंतर तिथं उपलब्ध सेवांमध्ये Link Aadhar वर क्लिक करा. एक नवं पेज उघडेल.

– त्यात तुमचा PAN, आधार क्रमांक, आधार कार्डावर लिहिलेलं तुमचं नाव आणि मोबाइल नंबर (Mobile Number) भरावा लागेल.