NEET UG 2021: विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीनं करा NEET रजिस्ट्रेशन; बघा किती लागणार शुल्क

32

भारतातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये (Medical Admissions) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना NEET ही प्रवेश परीक्षा (NEET entrance Exam) द्यावी लागते. यंदा अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी NEET UG ही परीक्षा (NEET UG 2021) 12 सप्टेंबर 2021 ला होणार आहे. यासाठीची रजिस्ट्रेशन प्रोसेस (NEET UG Registration process step by step) सुरु करण्यात आली आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन कसं करणार याबाबत माहिती देणार आहोत. या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर 6 ऑगस्टला रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख होती. मात्र NTA नं NEET UG 2021 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठीची अंतिम तारीख (NEET UG application Last date) वाढवली आहे. इच्छुक उमेदवार आता NEET UG 2021 चा अप्लिकेशन फॉर्म 10 ऑगस्ट संध्याकाळी 05 पर्यंत भरू शकणार आहेत.

असं करा रजिस्ट्रेशन सुरुवातीला अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या.

यानंतर होम पेजच्या तळाशी स्क्रोल करा आणि 'अप्लिकेशन फॉर्म' वर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरा, अप्लिकेशन नंबर एंटर करा आणि कागदपत्रं अपलोड करा. यानंतर दिलेल्या पद्धतीनुसार शुल्क भरावं लागेल. शुल्क भरून झाल्यावर तुमचा अप्लिकेशन नंबर नोट करून ठेवा किंवा तुमच्या फॉर्मचं प्रिंट घेऊन ठेवा. इतकं लागणार शुल्क NEET-UG 2021 परीक्षा सत्रासाठी नोंदणी शुल्क NTA ने जारी केलेल्या माहिती पुस्तिकेत दिलं जाईल. गेल्या वर्षीच्या बुलेटिनच्या आधारे, सामान्य (UR) उमेदवारांसाठी NEET अर्ज शुल्क 1500 रुपये होतं, तर EWS/OBC-NCL श्रेणीच्या उमेदवारांसाठी 1400 रुपये आणि SC/ST/PWD/Transgender उमेदवारांसाठी 800 रुपये शुल्क होतं.