आईला वाचविण्यासाठी लेकाने घेतली विहीरीत उडी मूल तालुक्यातील नांदगाव येथील घटना

63

मूल  :— तालुक्यातील नांदगाव येथील मानसिक संतुलन बिघडलेल्या मातेने विहिरीत उडी घेतली. त्यानंतर आईला वाचविण्यासाठी लेकानेही उडी घेतली.परंतु,त्यालाही पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघेही विहिरीत गटांगळया खावु लागले.ही घटना नांदगाव येथील उपसरपंचांच्या लक्षात आली. त्यानंतर मोठया शिताफीने विहिरीत उडी घेऊन मायलेकाला वाचविले.देव तारी त्याला कोण मारी,याचा प्रत्यय मूल तालुक्यातील नांदगाव येथे बुधवारी तारीख 4 सकाळी आठ वाजताच्या दरम्यान आला.
मायलेकांचा जीव वाचविणारे नांदगावचे उपसरपंच सागर देऊरकर यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील नांदगाव येथे नारायण नरसपुरे कुटुंबीय राहतात.घरची परिस्थिती बेचाचीच. घरात अठरा विश्व दारिद्रय.त्यात वृध्द नारायण स्वता आजारी आणि त्यांची पत्नीसुध्दा गंगुबाई ही मानसिक संतुलन बिघडलेली या सर्व गोष्टीला ती त्रासलेली.ही वेडसर महिला भल्या सकाळीच घरून गायब झाली.
मुलाने आपल्या आईचा शोध घेतला. फुटाणा मार्गावरील एका मोठया विहिरीवर ती बसलेली दिसली. आपल्या मुलाला आपल्याकडे येताना पाहून तिने विहिरीत उडी घेतली. मुलानेही मागचा पुढचा विचार न करता धावत जावून आईला वाचविण्यासाठी विहीरीत उडी घेतली. परंतु,त्याला पोहता येत नव्हते.गटांगळया खात असताना तो मदतीसाठी किंचाळू लागला.


ही घटना शेताकडून परत येत असताना नांदगावचे उपसरपंच सागर देऊरकर यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच विहीरीकडे धाव घेतली. मायलेक दोघेही विहिरीत पडल्याचे दिसले.त्यांनी विहीरी जवळील सागाच्या झाडाची फांदी तोडून विहीरीत टाकली. स्वता विहिरीत उतरून या दोघांनाही बाहेर काढले.तो पर्यंत नागरिकही घटनास्थळी दाखल झाले.
नशीब बलवत्तर असल्याने मायलेकांसह उपसरपंचास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मायलेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारे उपसरपंच सागर देऊरकर यांच्या धाडसाचे नांदगावात कौतूक होत आहे.
देव तारी त्याला कोण मारी,म्हणतात ना हे खरेच आहे.जन्मदात्री आईला वाचविण्यासाठी मुलाने उडी मारली. परंतू या मायलेकांना वाचविण्यासाठी उपसरपंचानी उडी मारून आपल्या कर्तत्वाला निभावले. संकटसमयी आपला जीव धोक्यात घालून नागरिकत्वाचे पालन केले.
पावसाळी दिवसांत विहीर तुंडुब भरलेली ​असतानाही एकमेकांसाठी असलेला जीव सुखरूपपणे वाचला.