नवभारत कन्या विद्यालयात गुणवंत विद्याथिनींचा सत्कार

33

मूल :— येथील नवभारत कन्या विद्यालयात गुणवंत विद्याथ्र्याचा सत्कार सोहळा पार पाडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शुभांगिनी वैरागडे होत्या.यावेळी सुधाकर पुराम,संजय बारसागडे,दिनेश जिडीवार,विजय सिध्दावार,संतोष गवारकर,एस.एल.देवाडे,अर्चना बेलसरे, तृप्ती रामटेके,मंजुषा पंधरे,एस.खाडे,अशोक येरमे उपस्थित होते.

    मुख्याध्यापिका वैरागडे यांनी विद्याथिनींनी भविष्यात उज्वल यश संपादन करून विद्यालयाचा लौकिक वाढवावा,असे आवाहन केले. सुजाता भडके,संतवाणी संदावार,शताब्दी सुखदेवे,पलक फलके,तन्वी कोमलवार या विद्याथिनींचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे यांनी अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाचे संचालन मिलिंद रामटके यांनी,तर आभार उज्वला चहांदे यांनी मानले. कार्यक्रमला शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.