मुल तालुक्यातील चिचोली गावाजवळ रेल्वेच्या धडकात अस्वलाचा मृत्यू

29

मूल :— तालुक्यातील चिचोली येथे आज पहाटेच्या सुमारास साधारण चार साडेचार वाजता च्या दरम्यान रेल्वेमार्गावरुन गमन करीत असलेल्या अस्वलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही मादी अस्वल तीन वर्षाची आहे.
चिचपल्ली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या मूल उपक्षेत्रातील , ही घटना आहे.
अपघात घडलेली मालगाडी मूल कडून गोंदिया कडे जात असताना चिचोली गावाजवळ रेल्वे लाईनच्या पिलर क्रमांक.११९८/९ जवळ हा अपघात घडल्याचे आढळून आले.
मृत अस्वलीला मागील बाजूस शेपटी जवळ व मागच्या डाव्या बाजूच्या पाया जवळ धडक बसलेल्या जखमा दिसून आल्या आहेत.
वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मोकापंचनामा करुन मृत अस्वलीला शवविच्छेदना करीता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, चिचपल्ली येथे रवाना केले.
ही अस्वल मागील तीन वर्षांपासून मूल येथील कर्मवीर महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय परिसरात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना दिसत होती मात्र कधिही कुणाला इजा वा दगाफटका केल्याची घटना उघडकीस आली नव्हती,मात्र आज त्या अस्वलिचा मृत्यू झाला आणि मूल परिसरात अस्वलिचा वावर संपुष्टात येतो की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.