‘नाते आपुलकीचे’ बहुउदेशीय संस्थेच्या लक्षात येताच अनुरागला मदतीचा हात

37

मूल :— तालुक्यातील जुनासुर्ला या गावात वास्तव्यास असलेला युवक अनुराग रवींद्र गोवर्धन हा कानाच्या आजाराने ग्रस्त होता.मागील दोन वर्षापासून आजाराशी लढा देत हाता. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले नाही.घरची परिस्थिती बेताची असल्याने आवश्यक तेवढा खर्च कुटूंबाला झेपत नव्हता.ही अडचण ‘नाते आपुलकीचे’ बहुउदेशीय संस्थेच्या लक्षात येताच संस्थेने अनुरागला मदतीचा हात दिला.

चंद्रपूर जिल्हयातील प्रसिध्द कान,नाक,घसा तज्ञ डॉ.अजय कांबळे यांच्याकडे उपचारासाठी नेले असता,डॉक्टरांनी 20 हजाराच्या खर्च आहे, असे सांगितले.त्या नंतर संस्थेच्या सदस्यांनी पैशाची तडजोड करून तत्काळ संस्थेतर्फे 20 हजाराची मदत दिली. जुनासूर्ला येथील हा युवकसरदार पटेल महाविद्यालयात,चंद्रपूर येथे बी.ए.प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे.

घरची परिस्थीती व समोरील शिक्षणास अडथळा येऊ नये यासाठी संस्थेने त्याला मदतीचा हात दिला. यावेळेसे संस्थेचे अध्यक्ष संतोष ताजणे,उपाध्यक्ष किसन नागरकर,सचिव प्रा.प्रमोद उरकुडे,संघटक महेश गुजेकर,गणेश पाचभाई,बबन भारस्कर,मनोहर डवरे,अमोल गोंगले यांच्याउपस्थितीत अनुरागाच्या उपचारासाठी 20 हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

युवक अनुरागच्या बिकट परिस्थितीमध्ये संस्थेने धावून येऊन मदतीचा हात दिल्याने,त्याच्या शिक्षणातील अडथळा दूर होईल व जीवनात स्वत:ला सिध्द ​करण्याची संधी मिळेल,असे मत अनुरागने दर्शविले.