ग्रामसभेत मतदान घेण्याची विदर्भातील पहिली घटना

69

मुल – मुल तालुक्यातील बेंबाळं ग्राम पंचायत सरपंचावर भाजपच्या स्वपक्षाकडूनच अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आल्याने शासनाच्या १ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णया नुसार सदर ठराव अवैद्य असल्याचे लक्षात आल्याने सरपंच करुणा उराडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे धाव घेतली. महिला सरपंच उराडे यांच्या बाजूने निर्णय दिल्याने अविश्वास दाखल करणाऱ्यांना खाली बघण्याची वेळ आली. सरपंच उराडे ह्या डायरेक्ट निवडून आली असल्याने संपूर्ण गावकरी, सरपंच यांच्या बाजूनेच असल्याची चर्चा गावात केली जात होती. यात मात्र अविश्वास दाखल करणाऱ्या गावातील ऐका भाजपच्या पदाधिकारी यांचे पितळ उघडे पडत असल्याने हा अविश्वास आणण्यात आला होता. परंतु केव्हा-ना-केव्हा सत्य बाहेर येणारच होते शेवटी सर्व प्रयत्न करूनही जे व्हायचे तेच झाले.आणि उराडे यांच्या बाजूने तिचे संपूर्ण समाज बांधवासोबत कांग्रेसच्या सहानुभूतीने सरपंच उराडे यांची बाजू मजबूत राहील अशी चर्चा गावात केली जात होती. शेवटी जिल्हाधिकारी यांच्या आदेशनव्ये तहसीलदार यांनी विशेष ग्रामसभा आयोजित करुन गावातील ३१५३ मतदारांना सहभाग घेण्याचे आवाहन केल्याने दिनांक २२ जुलै २९२१ रोजी विवेकानंद विद्यालय बेंबाळं येथे ग्राम सभा घेण्यात आली. मतदानासाठी अशी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची *विदर्भातील पहिलीच वेळ आहे हे विशेष* मात्र या ग्राम सभेसाठी ३५ पोलीस ताफ्याच्या बंदोबस्ततआणि तहसीलदार डाँक्टर रवींद्र होळी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार साधनकर,पवार, तलाठी, यांचेसह ३० कर्मचारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जीवन प्रधान,जिडगीलवर, ग्राम सेवक, नगर परिषद कर्मचारी असे एकूण ४५ अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने मतदान प्रक्रीया पार पाडण्यात आली. सकाळी १० वाजता मतदारांची नोंदणी सुरु करण्यात आली तेव्हा १-००, वाजेपर्यंत १५५३ मतदारांची नोंदणी झाली.  एकूण १११९ मतदान झाले, त्यापैकी सरपंच करुणा उराडे यांच्या बाजूने ६५६ ,तर अविश्वासाच्या बाजूने ४०५ तर अवैद्य मतदान ५८ झाले असून महिला सरपंच करुणा उराडे यांचा २८० मतांनी विजय झाला.

अविश्वास दाखल केलेल्या गावातील भाजप नेत्यांना पराभवाचा मार खावा लागला. सरपंच उराडे यांचा विजय म्हणजे संपूर्ण ग्रामस्थांचा विजय असा जल्लोष बेंबाळं गावकऱ्यांमध्ये केला जात आहे. महिला सरपंच करुणा उराडे यांच्या बाजूने समस्त गावकरी असल्याने त्या आपला कार्यकाळ नक्कीच पूर्ण करतील यात शंका नाही .मात्र अविश्वास दाखल करणाऱ्यांचे कोणते पितळ उघडे पडतील हे येणारी वेळच सांगेल. अशीही चर्चा गावात केली जात आहे.