Aadhaar Card Update | आधार लॉक आणि अनलॉक करून आपली आयडेंटिटी करा सुरक्षित, इथं जाणून घ्या सोपी पद्धत

72

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी सुविधांमध्ये अनेक नवीन बदल आणि अपडेट (Aadhaar Card Update) केले आहेत. या फिचर्सचा वापर करून तुम्ही आधार कार्ड (Aadhaar Card Update) कधीही लॉक किंवा अनलॉक करू शकता. आधारला लॉक आणि अनलॉक कसे करावे ते जाणून घेवूयात…

आधार कार्ड असे करा लॉक

 यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
 यानंतर ‘माय आधार’ मेनूवर जा आणि ‘आधार लॉक आणि अनलॉक सर्व्हिस’ निवडा.
 नंतर दुसर्‍या पेजवर नेले जाईल. येथे ‘लॉक यूआयडी’ पर्यायावर क्लिक करा.  यानंतर 12 अंकाचा आधार कार्ड नंबर नोंदवा. दिलेल्या जागेत नाम आणि एरियाचा पिन कोड नोंदवा. असे केल्यानंतर ‘व्हेरीफाय’ पर्यायावर क्लिक करा.
 यानंतर ‘सेंड ओटीपी’ पर्यायावर क्लिक करा आणि नंतर रजिस्टर्ड फोन नंबरवर पाठवलेला वन टाइम पासवर्ड (ओटीपी) नोंदवा. यानंतर तुमचे आधार लॉक आणि सिक्युअर होईल.

आधार असे करा अनलॉक

 यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
 यानंतर ‘माय आधार’ मेनूवर जा आणि ‘आधार लॉक आणि अनलॉक सर्व्हिस’ निवडा.
 यानंतर अनलॉक ऑपशन निवडून अनलॉक यूआयडीवर क्लिक करा.
 नंतर व्हर्च्युअल आयडी किंवा व्हीआयडी सिक्युरिटी कोडसह नोंदवा.
 यानंतर ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.
 सेंड ओटीपीवर क्लिक केल्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी नोंदवल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. यानंतर तुमचे आधार कार्ड अनलॉक होईल.

Web Title :- Aadhaar Card Update | secure your identity by locking and unlocking aadhaar know here the easy way