SSC GD Notification 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन जारी, 25 हजार जागा, 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

49

SSC GD Notification 2021 Released नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार बऱ्याच दिवसांपासून या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. नोटिफिकेशन पहिल्यांदा मे महिन्यात जारी होणार होतं. मात्र, अखेर नोटिफिकेशन जारी करण्यात आल्यानं उमदेवारांना दिलासा मिळाला आहे. अखेर 25 हजार पदांवर भरती प्रक्रिया होणार आहे.

एकूण किती पदांवर भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशननं यावेळी 25271 पदांवर भरती प्रक्रिया राबवली होती. भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा आहेत तर, महिला सांठी 2847 पद आहेत. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर, अर्जाचं शुल्क ऑनलाईन जमा करण्याची अखेरची मुदत 2 सप्टेंबर तर चलनाद्वारे सादर करण्याची अखेरची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत आहे.

महत्वपूर्ण तारखा

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 17 जुलै
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख- 31 ऑगस्ट (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑनलाईन फी जमा करण्याची अखेरची तारीख – 2 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)
ऑफलाईन चलन जनरेट करण्याची अखेरची तारीख- 4 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)
चलनाद्वारे फी जमा करण्याची अखेरची तारीख – 7 सप्टेंबर
टियर – 1 परीक्षा (सीबीटी) चे तारीख- नंतर कळवली जाणार आहे

विभागनिहाय पदसंख्या

बीएसएफ: 7545
सीआयएसएफ : 8464
एसएसबी : 3806
आयटीबीपी :1431
आसाम रायफल्स: 3785
एसएसएफ: 240
यावेळी सीआरपीएफ आणि एनआयएमध्ये कोणत्याही जागा निघालेल्या नाहीत.

 

पात्रता

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

ज्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असेल ते अर्ज दाखल करु शकतात.

शारीरिक पात्रता

उंची
पुरुष उमेदवार – 170 सेमी.
महिला उमेदवार – 157 सेमी.

छाती
पुरुष उमेदवार – 80 सेमी. (फुगवून – 85 सेमी)

पगार

उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 च्या प्रमाणे 21700-69100 रुपये पगार मिळणार आहेत.

अर्ज कुठे सादर करायचा?

स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती

SSC GD Constable Recruitment 2021

जाहिरात क्र.: 3-1/2020-P&P-I

Total: 25271 जागा  

पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी) 

फोर्स नुसार तपशील:

अ.क्र. फोर्स  पुरुष/महिला  Total  Grand Total 
1 BSF पुरुष 6413 7545
महिला 1132
2 CISF पुरुष 7610 8464
महिला 854
3 CRPF पुरुष 00 00
महिला 00
4 SSB पुरुष 3806 3806
महिला 00
5 ITBP पुरुष 1216 1431
महिला 215
6 AR पुरुष 3185 3785
महिला 600
7 NIA पुरुष 00 00
महिला 00
8 SSF पुरुष 194 240
महिला 46

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष General, SC & OBC 170 80/ 5
ST 162.5 76/ 5
महिला General, SC & OBC 157 N/A
ST 150 N/A

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा: नंतर कळवण्यात येईल.