मूल शहरात दर रविवारला पाळला जाणार कोरडा दिवस

61

मूल :— नगर परिषद मूल क्षेत्रात किटकजन्य आजारासंबंधीत कोणत्याही प्रकारचा साथरोगाचा उद्रेक होवू नये याकरीता मूल शहरात दर रविवारला कोरडा दिवस पाळला जात आहे.
घरातील व व्यवसायातील कूलर टाकी,फुटके माठ,टायर व इतर साहीत्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यू ,मलेरीया,आजाराचे डासअळी तयार होत असल्याने दर रविवारला नागरीक व व्यवसायीकांनी सर्व साहीत्यामधील पाणी काढून रिकामे करून कोरडा दिवस पाळयात यावा.तसेच साथरोग संबंधाने उपाय योजना म्हणून नगरपरीषदच्या वतीने घरोघरी डासअळी तपासणी,वैयक्तिक शौचालयाचे वेंटपाईपला जाळी बसविणे, नालीत जंतूनाशक फवारणी करणे,सांडपाणी वाहते करणे,साचलेल्या डबक्यात वेस्ट आॅईल टाकणे असे विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. तरी नागरीकांनी दर रविवारला कोरडा दिवस पाळून डासअळीचा नायनाट करण्याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन श्री सिध्दार्थ मेश्राम मुख्याधिकारी नगरपरिषद मूल यांनी केले आहे.