कृषी संजीवनी सप्ताह निमित्य कार्यक्रम व वृक्षारोपण

57
मुल- डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मुल तालुक्यातील निसर्गरम्य सोमनाथ येथे नव्याने स्थापन झालेल्या कृषी महाविद्यालयात १ ते ७ जुलै २०२१ या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला असून याप्रसंगी हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण अर्पण करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे अभिवादन करण्यात आले. आणि महाविद्यालयात परिसरात विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.                                  
सप्ताहातील 2 जुलै पासून  महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डाकट्टर.विष्णुकांत टेकाळे, डाकट्टर.अरविंद खंडारे, डाकट्टर.दिनेश नवलकर, निलेश गावंडे, व इतर कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धान, कंपास,सोयाबीन, इत्यादी पिकाबाबत  शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांसोबत शेतीबाबत विविध समशेवर चर्चा करण्यात आली. व कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेली कृषिचे संपूर्ण तंत्रज्ञान असलेली कृषी संवादिनी बाबतची माहिती त्याची सापट कापी शेतकऱ्यांना भेट देण्यात आली.
           या कार्यक्रमाला उसराला, मारोडा, आदर्शखेडा, सोमनाथ, येथील विजय पुल्लवार, बेबीताई नेवारे, राजेश वाढई, विजय वाढई, शंकर सहारे, दीपक प्रधाने, प्रदीप नेरलवार, पुरुषोत्तम नागपुरे, हृतिक येरमे, ईश्वर शेरकी, सुभाष नेवारे, संजय मंडलवार, गजानन इरतांम इत्यादी शेतकऱ्यांच्या बांधावर, जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
           या निमित्य उपयोगी माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांचा वाटसाप ग्रुप तयार करण्यात आला. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी  कृषी सप्ताह निमित्य विद्यार्थी ज्या गावातील आहेत त्या गावातील १० शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठातील विकसित तंत्रज्ञानाची माहिती समजाऊन सांगण्यात आली.
तसेच शेतकऱ्यांचे अनुभव विचारात घेण्यात आले. विद्यार्थ्यांमार्फत विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रकाशित कृषी संवादिनी ची मुळप्रत देण्यात आली. कृषी सप्ताह साजरा करण्यासाठी विदयार्थ्यांसह प्राध्यापकांनी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.