कोरोना मुळे अडचणीत सापडलेल्यांना अन्न धान्याचे वाटप

55

मुल : कोरोना च्या या संकटकाळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामस्थांना जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान संस्थेतर्फे मूल तालुक्यातील गावांमध्ये अन्न धान्याच्या किट चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ तालुक्यातील मारोडा येथील ग्राम पंचायत कार्यालयात करण्यात आला. कार्यक्रमात गट विकास अधिकारी मयूर कळसे, सरपंच भिकारू शेंडे,ग्राम विकास अधिकारी विलास भोयर, सर्व ग्रामपंचायत सदस्य , संस्थेचे अध्यक्ष नितीन नार्लावार, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. खुशबू चंदेल, जगदीश राऊत, प्रसाद वाघ, तालुका समन्वयक शुभांगी तरेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावात कोरोना लसीबाबत जनजागृती साठी जागृती रथ फिरविण्यात आला. कार्यक्रमात कळसे यांनी गावकऱ्यांना कोरोना लशीचे महत्व पटवून देऊन सर्वांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी गावकऱ्यांना मास्क व सॅनिटाईझर चे पण वाटप करण्यात आले.