मूल तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी केले

49

खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत !

मूल : खरीप हंगामासाठी (Kharif season) पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (Prime Minister Crop Insurance Scheme) शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी केले आहे. पीक विमा योजनेसाठी 2021 या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ www.pmfby.gov.in कार्यान्वित झालेले आहे. (Kharif season crop insurance term till 15th July)
तालुक्यातील अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी पीक विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 साठी भारती ऍक्‍सा जनरल एन्शुरन्स कं. लि. (Bharti Axa General Insurance Co. Ltd.) या विमा कंपनीची नेमणूक केली आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी न झाल्यास विमा संरक्षण, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण मिळणार आहे. योजनेत समाविष्ट पिके तालुक्यातील खरीप हंगाम 2021 मध्ये धान(भात) सोयाबीन, तूर पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रतिकूल प​रिस्थितीत पिकांचे नुकसान टाळून उत्पादनात येणारी घट टाळण्यासाठी शेतक—यांनी पीक विमा काढावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये सहभागाची अंतिम तारीख 15 जुर्ले पर्यंत असली तरी कर्जदार शेतक—यंानी शुक्रवार पर्यंत दिनांक 9 बॅंकेत जाऊन स्वत:चे घोषणपत्र स समंतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2021—22 वर्षासाठी राबविण्यात सुरूवात झाली आहे. या योजनेत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतक—यांनी सहभाग घेण्यासाठी प्रचार—प्रसिध्दी करण्यात येत आहे.
तालुक्यात पीक अधिसूचित असून त्यासाठी सर्व शेतक—यांनी सहभागासाठी बॅंक,कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, प्रादेशिक ग्रामीण बॅंक,आपले सरकार सेवा केंन्द्र,सिएससी केंन्द्र,व विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या मार्फत विमा हप्ता भरता येईल. बिगर कर्जदार शेतक—यांना योजनेमध्ये समाविष्ठ करण्यासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचे आहेत.यासाठी कर्जदार शेतक—यांनी शुक्रवारपर्यंत बॅंकेत जाऊन स्वत:चे घोषणापत्र व संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे,असे आवाहन तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी कळविले आहे