अशी आहेत आवश्यक कागदपत्रे :विद्यार्थी,पालकांसाठी माहिती प्रवेशाचे दाखले असे मिळवा

38

मूल (प्रमोद मशाखेत्री) :— तंत्रनिकेतन,औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) वैद्यकिय ,कृषी,अभियांत्रिकी,अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्या असून विद्यार्थी तयारीला लागले आहेत. त्यासाठी विविध दाखले व प्रमाणपत्राची गरज भासते. ही प्रमाणपत्रे मिळविण्याकरीता अडचणी येऊ नये,याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती,प्रक्रिया कशी चालते.याची माहिती विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून देत आहेत.

उत्पन्नाचा दाखला :— 35 रूपये
1) उत्पन्नाचा तलाठयांचा दाखला,शहरातील असल्यास तलाठी कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला 2) नौकरी असल्यास (आयकर विवरणपत्र )  3)शेती असल्यास (सातबारा) 4) रेशनकार्ड,आधारकार्ड

21000 हजार उत्पन दाखल्यासाठी :— 1) तलाठी अहवाल 2) उत्पन्नाचा दाखला 3)आधार कार्ड
या दाखल्यासाठी आपले सरकार केंन्द्रात अर्ज करावा.

डोमिसियल (वय,अधिवास आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला)
1) मूळ महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक 2) शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक 3) 15 वर्षाचा रहिवासी सिध्द करण्यासाठी आवश्यक असलेले (वीज बिल,असेसमेन्ट,उतारा,साताबारा,जन्मदाखला,घरटॉक्स पावती, ग्रामपंचायत मधील नमुना 8,नगरपालीका मधील नमूना 48
4)रेशनकार्ड,आधारकार्ड यापैकी एक
या दाखल्यासाठी आपले सरकार केंन्द्रात अर्ज करावा.