पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता नाही.लाभार्थ्यांंनी कर्ज काढून बांधकाम

33

घराच्या पायाचे बांधकाम पूर्ण; योजना पूर्ण होण्याबाबत साशंकता

मूल : पंतप्रधान  घरकुल लाभार्थ्यांंनी पहिल्या हप्तय़ात घरकुलाचा पायाचे बांधकाम करून ठेवले आहे. मात्र महिना उलटूनही लाभार्थ्यांंना घरकुलाचा दुसरा हप्ता मिळत नसल्याने मुल नगरपालीका क्षेत्रातील घरकुल लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. दुस—याच हप्तय़ाला एवढा वेळ तर तिसरा, चौथा हप्ता कधी मिळणार आणि आम्हचे घरकुल पूर्ण कधी होनार? या चिंतेत घरकुल लाभार्थी आहे.

शासनाकडून गरिब आणि कुडामातीच्या घरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना वर्गीकरणानुसार पंतप्रधान घरकुल योजना या योजनांमधून घरकुल दिले जात आहे. त्यातून त्यांचे पक्के घर तयार होणार आहे. मात्र, शासनाकडून घरकुलाचा हप्ता वेळेवर मिळत नसल्याने, लाभार्थ्यांनी घरकुलाचा पाया बांधून हप्त्याची वाट आहेत. या वर्षी तरी घर पूर्ण होणार की, नाही.

त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळून काहींनी पाया बांधून ठेवला आहे. तर ज्यांना दुसरा हप्ता मिळाला आहे. त्यांनी अर्धी घरकुल म्हणजे लिंटल (दारकस) व भिंती बांधून ठेवल्या आहेत. घरकुल अपूर्ण अवस्थेत आहेत. त्या घरकुल लाभार्थ्यांंना पुढील हप्ता मिळणार कधी? तर घरकुल पूर्ण करण्यासाठी पुढील हप्ता वेळेत मिळावा अशी मागणी घरकुल लाभार्थी करीत आहेत. प्रधानमंत्री घरकुल  योजनचे घर बांधताना लाभार्थ्यांना पहिला हप्ता 40 हजार रु, पाया बांधणे, दुसरा हप्ता ४0 हजार रुपये, भिंती बांधून लिंटल, (दारकस) बसविणे, तर तिसरा हप्ता हजार रु, पत्रे टाकणे, घरकुल पूर्ण करणे. आणि चौथा हप्ता न्हाणीघर बांधणे असे घरकुलासाठी 2 लाख 50 हजार रुपयांचे शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांला अनुदान दिले जात आहे.
या कामांच्या टप्प्यानुसार लाभार्थ्यांना हप्ते देऊन घरकुल बांधून दिले जात आहे. घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळावा. यासाठी घरकुल लाभार्थी मागणी करीत आहेत.

पावसाळ्यात समस्या

आम्ही घरकुलाचा पाया बांधून ठेवला आणि दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहोत. महिना झाला अजून दुसरा हप्ता आला नाही. दुसरया हप्त्याला एवढा वेळ तर तिसरा आणि चौथा हप्ता कधी मिळणार आणि आम्ही आमचे घरकुल कधी पूर्ण करणार, बा प्रश्न आहेच. पण, पावसाळ्यापर्यंत काम पूर्ण न झाल्यास परिस्थिती कठीण होईल, अशी प्रतिक्रिया घरकुल योजनेचे लाभार्थी यांनी व्यक्त केली.