चिचपल्लीच्या जंगलात अस्वालाचा 4 गुरखावर हल्ला

27

चिचपल्लीच्या जंगलात अस्वालाचा 4 गुरखावर हल्ला

चंद्रपूर :— चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या सातारा तुकुम येथील कक्ष क्रमांक —436,कक्ष क्रमंाक 435 मध्ये जनावरे चरावयासाठी घेऊन गेलेल्या चार गुरख्यांवर घनदाट जंगलात दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला केला.यात चारही गुराखी जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिववार3 जुर्ले दुपारी 1 वाजताचे सुमारास घडली.
विलास तुकाराम पेंदोर वय 54 सीताराम किसन मडावी वय 57
प्रफुल रघूनाथ सिडाम वय 45 सर्व मु सातारा तुकुम तर रूपेश गजानन कुळमेथे 32 मु भानसी सावली जखमीचे नाव आहे
सविस्तर वृत्त असे की, सातारा तुकुम येथील विलास तुकाराम पेंदोर,​सीताराम पेंदोर,सीताराम किसन मडावी हे दोघेही कक्षक्रमांक 426 च्या रेगुलर जंगलात गुरे चारण्याकरिता गेले हेाते. घनदाट जंगालात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.
तर दुस—या घटनेत सातारा तुकुम येथीलच प्रफुल रघुनाथ सिडाम तर रूपेश गजानन कुळमेथे मु.भानसी (सावली) हेही दोघेकक्ष क्रमांक 435 एफडीसीमच्या जंगलात गुरे चारण्याक​रीता गेले होते. यांच्यावरही अस्वलाने हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले.दोन्ही घटनेत चार जण जखमी झाले .
सदर घटनेची माहिती वनविभागास मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनस्थळी व जखमी पर्यंत पोहचले. चारही जणांना जिल्हा सामान्य रूग्णालयात चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
गंभीर जखमी विलास तुकाराम पेंदोर यांच्या कुटंुबांना वनविभाग कर्मचारी मडावी यांचे कडून आर्थीक मदत देण्यात आलीआहे.
तर बाकीच्यांनाही तातडीने मदत देण्यात येणार असल्याचे वनविभागाने कळविले आहे.
आजच्या या घटनेने सातारा तुकूम परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने त्वरित अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.