वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकांच्या वारसांना वनविभागातर्फे मदत       

28

मुल- जाणाळा वनविभागाच्या क्षेत्र क्र.718 मध्ये जानाला येथील किर्तीराम कुलमेथे हा अल्प भूधारक शेतकरी आपली गाय चारण्यासाठी जंगलात नेली असता वाघाने हल्ला करून किर्तीराम याला जागीच ठार केले. याबाबतचा पंचनामा व संपूर्ण अहवाल वानपरिक्षेत्र अधिकारी यांनी शासनाकडे सादर केले असता शासनाने मृतकास पाच लाखाची मदत दिली. मदतीचा चेक विभागाच्या पंचायत समिती सादशा वर्षाताई लोनबले यांचे हस्ते मृतकांच्या वारसदारांना देण्यात आले याप्रसंगी वनविभागाचे वानपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर, सरपंच रंजना भोयर, पोलीस पाटील दर्शना गेडाम, वनरक्षक राकेश गुरनुले, भुमेश्वर गेडाम, विनायक निकोडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
तसेच कांतापेठ येथील कल्पना नामदेव वाढई ही महिला मोहफुलें वेचण्यासाठी गेली असता तिच्यावरही वाघाने हल्ला करून तिलाही ठार केले होते. याचाही अहवाल वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर व वनरक्षक राकेश गुरनुले यांनी वन विभागाच्या वतीने शासन स्तरावर पाठविण्यात आला होता करिता मृतकांला पंधरा लाखाचे अनुदान मंजूर केले असून याचाही चेक मृतकांच्या वारसदारांना प.स.सदशा वर्षाताई लोनबले यांचे हस्ते देण्यात आले असता याप्रसंगी ग्राम पंचायत सदश दर्शना कींनाके,विनायक निकोडे, आणि या वनविभागाचे वानपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर, जानाला वनरक्षक राकेश गुरनुले व ग्रामस्थ उपस्थित होते.