मूल नगरीतील महात्मा फुले चौकाचे सौंदर्यीकरण करा माळी महासंघाचे तालूका अध्यक्ष राकेश ठाकरेंची मागणी

29

मूल –
मूल शहरातील पोस्ट ऑफिस जवळच्या महात्मा ज्योतिबा फुले चौकाचे सौंदर्यीकरण करण्यांत अश्या आशयाची मागणी माळी महासंघ मूलचे तालुका अध्यक्ष राकेश ठाकरे यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे आज गुरुवार दि.१जूलैला एका निवेदनातुन केली आहे. नगर परिषदेच्या विविध विकासकामे तथा पुतळा उद्घाटन कार्यक्रमासाठी ते मूल नगरीत आले होते. नगर परिषदेने सदरहु चौकाला महात्मा ज्योतिबा फुले चौक असे नाव दिले आहे, महात्मा फुलेंच्या आस्थेने चालणारे अनेक अनुयायी आहेत, आजच्या तरुण पिढीला त्यांच्या आदर्श तत्वावर चालून नवभारत घडवायचा आहे करीता त्यांची स्मृती सदैव तेवत राहण्यासाठी त्यांचे एक स्मारक या ठिकाणी राहणे गरजेचे आहे,म्हणून लवकरात लवकर सदर चौकाचे सौदर्यीकरण करून द्यावे अशी मागणी माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष राकेश ठाकरे यांनी केली निवेदन देताना माजी न .प. अध्यक्ष उषाताई शेंडे, वासुदेवजी लोनबले, नगरसेविका शांताताई मांदाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, जेष्ठ कार्यकर्ते सुधीर नागोशे, राकेश मोहूर्ले, चित्तरंजन वाढई,विवेक मांदाडे, रामदास गुरनुले,सौरभ वाढई, मनोज कावळे,महेश जेंगठे, सुधीर वाडगुरे,राजेश गुरनुले तथा असंख्य माळी समाजबांधव उपस्थित होते .