सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरीता कर्ज योजना जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर कडून

25

चंद्रपूर :- सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वत:चा उद्योग, सेवा उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सन २0२१-२२ या वर्षाकरिता जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ग्रामीण व शहरी भागात सुधारीत बीज भांडवल कर्ज योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
सुधारीत बिज भांडवल कर्ज योजना: अर्जदार कमीत कमी ७ वी पास व वयोमयार्दा १८ ते ५0 वर्ष असावे. अर्जदार महाराष्ट्राचा किमान १५ वषार्चा रहिवासी असावा. वैशिष्टे :उदयोग सेवा व व्यापार व्यवसायातील प्रकल्प मयार्दा रु.२५ लाखापयर्ंत आहे. १0 लाखावरील प्रकल्पास बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या १५ टक्केप्रमाणे अथवा जास्तीत जास्त ३.७५म लक्ष बीज भांडवल रक्कम देण्यात येते. १0 लाखापेक्षा कमी प्रकल्पास सर्वसाधारण प्रवगार्तील लाभधारकांसाठी १५ टक्के तर अनुसूचित जाती, जमाती, अंपग, विमुक्त व भटक्या जाती-जमाती आणि इतर मागासवगीर्यांकरीता २0 टक्के बीज भांडवल देण्यात येते. बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज सॉफ्ट लोन म्हणून दरसाल ६ टक्के व्याजाने देण्यात येते.
बीज भांडवल कर्जाची परतफेड विहित कालावधीत करण्यात आली नाही तर थकित रकमेवर दरवर्षी १ टक्के नुसार दंडनीय व्याज आकारण्यात येते. बीज भांडवली कर्जाची नियमितपणे विहित कालावधीत परतफेड करणार्‍या लाभार्थ्यांस ३ टक्के सवलत देण्यात येते. तसेच कर्जाची परतफेड ७ वर्षाच्या आत करावयाची असून त्यामध्ये ३ वषार्चा विलंबावधी समाविष्ट आहे. तर वाहतूक व्यवसायासाठी, व्यापार व सेवा उद्योगासाठी विलंबावधी ६ महिन्याचा राहील.
आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट आकाराचे फोटो, मार्कशीट, टीसी, राशन कार्ड, सेवायोजन नोंदणी जागा भाडेतत्त्वावर असल्यास संमतीपत्र तसेच अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
पात्रता : अर्जदारास शिक्षणाची व वयाची अट नाही. अर्जदाराचे महाराष्ट्रातील किमान १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. अर्जदार उद्योग सेवा व उद्योग नोंदणीस पात्र असावा. उद्योगांमधील यंत्रसामुग्रीची गुंतवणूक २ लाखाच्या आत असावी. उद्योगात १ लाख लोकवस्ती पेक्षा कमी असणार्‍या गावामध्ये सुरू करता येतो.लाभार्थ्यांस ६५ ते ७५ टक्के बँक कर्ज देण्यात येते. सर्वसाधारण प्रवगार्साठी २0 टक्के बीज भांडवल रु. मयार्दा ३ लाख ७५ हजार तर अनुसूचित जाती- जमाती करीता ३0 टक्के कमाल रु. ६0 हजारापयर्ंत देय राहील. बीज भांडवलावर व्याजदर ४ टक्के राहील. लाभार्थ्यास स्वत:चे ५ टक्के भांडवल भरणा करणे आवश्यक आहे. कजार्चा परतफेड कालावधी ७ वर्षे आहे.