मिताली सेठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ

44

डॉ. मिताली सेठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ

चंद्रपूर :— कोरोना महामारीच्या काळात आपल्या उत्कृष्ठ कार्याचा चंद्रपूर जिल्हयावर ठसा उमटवणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची बुधवारी बदली झाली असून,जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ म्हणून अमरावतीच्या सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी रूजू होणार आहेत. धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात प्रकल्प् अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणा—या सेठी यांनी मेळघाटात उत्तम काम केले असून,शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.
मागील दोन वर्षापासून सीईओ राहुल कर्डिले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचा उत्तमरित्या कारभार सांभाळला. कोरोना महामारीच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार व विद्यमान जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या सोबत क्रर्डिले यांनी कोरोना नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावली.
कोरोनाच्या दुस—या लाटे दरम्यान सीईओ कर्डिले यांनी ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी सरपंचांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून जनजागृती केली. परिणामी शेकडो गावांनी कोरोनाला हदपार करण्यात यश मिळविले. जिल्हयातील वरोरा तालुक्यात हळद क्लस्टर तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून,नव्या उपक्रमांना नेहीम साद देणारे प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
चंद्रपूरात दोन वर्ष दोन महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ झाला असून,बुधवारी शासनाने त्यांीच बदली केली असली तरी पदस्थापनेचे ठिकाण मात्र दिलेले नाही. दरम्यान,शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने चंद्रपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिताली सेठ यांना पदोन्नती दिली असून,सद्यस्थितीत त्यांच्याकडे असलेल्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने इतर अधिका—यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा,असे बदली आदेशात म्हटले आहे.
दरम्यान,सीईओ राहुल कर्डिले यांच्यानंतर चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेला आयएएस महिला अधिकारी मिळणार आहे.