स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून ओबीसी जनगणना करावी (माळी महासंघाची मागणी )

55

मुल- नुकतेच रद्द करण्यात आलेले स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत कायम ठेवून ओबीसींची जनगणना केंद्र व राज्य सरकारने करावी अशी मागणी माळी महासंघ चंद्रपूर जिल्ह्यच्या वतीने राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मुल येथिल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फतीने ऐका लेखी निवेदणाद्वारे केली. माळी महासंघाच्या वतीने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डाँक्टर एन.एस.कोकोडे, नागपूर विभागीय सचिव माजी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार समाजाच्या महिला जेष्ठ नेत्या चंद्रपूर जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, समाजाचे मार्गदर्शक माजी जि. प. सदश प्रा.रामभाऊ महाडोळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार डाँक्टर रवींद्र होळी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना ओबीसीचे आरक्षण व जात निहाय जनगणना करावी अन्यथा माळी महासंघाच्या वतीने आंदोलन पुकारून रास्ता रोको करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे मत जि. प.अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी समाजाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीसह प.स. सदशा वर्षा लोनबले माजी नगराध्यक्ष वासुदेव लोनबले, उषाताई शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डाँक्टर पद्माकर लेनगुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव गुरु गुरनुले, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रत्नाताई चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष गुरुदास चौधरी, महासंघाचे मुल तालुका अध्यक्ष राकेश ठाकरे, समजोत्थान मंडळाचे अध्यक्ष प्रा.सुधीर नागोशे, समता परिषदेचे पूर्वविभाग जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, दीपक पाटील वाढई, माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, माधुरी गुरनुले, युवक कार्यकर्ते राकेश मोहूर्ले, फिस्कुटी सरपंच नितीन गुरनुले, विवेक मांदाडे रामदास गुरनुले, हसन वाढई, अशोक महाडोळे , मनोज ठाकरे, उत्तम सोनूले , हसन वाढई, विनोद कावळे, गणेश सोनूले, अनिल गुरनुले, गणेश मोहूर्ले, रवींद्र मानदांडे, राजू मोहूर्ले,रुपेश निकोडे, जीवनदास लेनगुरे, यांचेसह अनेक महासंघाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.