नागरिक व व्यावसायिकांनी संचारबंदीचे नियम पाळावे.असे आवाहन मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी केले आहे.

60

मूल  :-   नगरपरिषद मूल क्षेत्रातील व्यापारी,फुटपाथधारक व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकार आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याकरीता निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात आदेशित केले आहे. स्तर-3 मधील तरतुदीनुसार मा.जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांचे आदेशानुसार दिनांक 28/06/2021  सोमवार पासून खालीलप्रमाणे निर्बंध लावण्यात येत आहे.

1) अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2) बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 वाजेपासून 4.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील.

3)रेस्टारेंट हॉटेल सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेने सुरू राहतील व सायंकाळी 4.00 वाजेपासून रात्रौ 9.00 वाजेपर्यंत फक्त पार्सल व घरपोच सूविधा देता येतील तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल व घरपोच सूविधा देता येईल.

4)सार्वजनिक स्थळे,खूली मैदाने,वॉक व सायक्लींग क्रींडा व खेळ दररोज सकाळी 5.00 वाजेपासून सकाळी 9.00 वाजेपर्यंत सुरू राहील.

5)सर्व प्रकारची अत्यावश्यक वगळता खाजगी कार्यालय सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सायंकाळी 4.00वाजेपर्यंत सुरू राहील.

6) लग्रसंमारंभ 50 व्यक्तीच्या उपस्थितीत पूर्व परवानगीने सुरू राहतील.

7) अंत्यविधी 20 व्यक्तीच्या मर्यादेत करता येईल .

8) बांधकामाची काम व शेतीविषयक कामे बाहेरून मजूर आणण्याचे बाबतीत सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सुरू राहतील.

9) व्यायामशाळ,सलून,ब्यूटीपार्लर दररोज सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सुरू राहतील.

10) जमावबंदी सायंकाळी 5.00वाजेपर्यंत आणि संचारबंदी सायंकाळी 5.00नंतर लागू राहील .

सदर नियमाचे उल्लंघन केल्यास कोरोना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यंत संबंधित आस्थापना दूकाने बंद ठेवण्यात येईल तसेच पहिला दंड 5,000/— दुसरा दंड 10,000 /—तिसरा दंड 20,000 /—रूपये याप्रमाणे तसेच कार्यक्रमाचे आयोजकांवर सूध्दा 10,000 /— दंड तात्काळ आकरण्यात येईल. तसेच ​बिना मॉस्क आढळलेल्या व्यक्तीवर 500/— रूपये दंड आकारण्यात येईल.
तसेच नागरीकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास खालील सूचनांचे नियमित पालन करावे मास्कचा वापर नियमित करावा, सामाजिक अंतर ठेवा तसेच हात वारंवार स्वच्छ करावे. असे आवाहन मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी केले आहे.