मूल तालुक्यात भारतीय जनता पार्टी तर्फे अनेक ठिकाणी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना वाहिली आदरांजली

34

मूल : २३ जून २०२१, बुधवार….

जिल्हा परिषद अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टी ग्रामीण च्या मूल तालुकाध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता महिला आघाडी च्या वतीने डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मूर्ती दिनानिमित्य डॉ शामाप्रसाद यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकण्यात आला.
‘एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नही चलेंगे.’ नारा देणारे राष्ट्रीय नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणतज्ज्ञ, वयाच्या ३३ व्या वर्षी जगातील सर्वात तरुण कलकत्ता विश्व विद्यालयाचे कुलपति, मानवतेचे उपासक व सिध्दांतवादी, संसदेत धारा- ३७० समाप्ती ची मागणी करणारे, जम्मू-काश्मीर च्या संपूर्ण विलीनीकरणाची मागणी करणारे व आंदोलना निमित्त प्रत्यक्ष जम्मू-काश्मीर मधे जाऊन प्रचार करण्याचा ज्यांनी निश्चय केला होता. आपला संकल्प पुर्ण करण्याससाठी बिना परवानगी जम्मू-काश्मीर च्या प्रवासास निघाले असते वेळी जम्मू-काश्मीर चे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे शासनाने त्यांच्या राज्य-प्रवेशावर बंदी घातली. बंदी मोडुन प्रवेश करीते वेळी त्यांना अटक झाली व तुरुंगातच रहस्यमय रीत्या त्यांचा अंत झाला.
प्रखर देशभक्त, मानवतेचे उपासक व सिध्दांतवादी, राष्ट्रीय एकतावादी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृती स विनम्र अभिवादन करण्यात आले.
मूल तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली मारोडा, उश्राला, चिरोली, राजोली, चिखली, डोंगरगाव, फीस्कुटी, चिचाळा अश्या अनेक ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली.

 

 

तसेच बेंबाळ – जूनासूर्ला जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये मा.श्री.चंदु मारगोनवार सभापती पंचायत समिती मूल यांच्या उपस्थितीत बेंबाळ, बोंडाळा(खुर्द), बोंडाळा (बुज), गोवर्धन, बाबराळा, दुगाळा (माल), चांदापुर, जूनासुर्ला, गडीसूर्ला या गावांमध्ये डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सौ. शीतल बाम्बोडे सदस्या जिल्हा परिषद, श्री. पृथ्वीराज अवताडे सदस्य जिल्हा परिषद, सौ. पूजा डोहणे माजी सभापती पंचायत समिती मूल, सौ. वर्षा लोनबले सदस्या पंचायत समिती, सौ. जयश्री वलकेवार सदस्या पंचायत समिती, दिलीप पाल, प्रवीण मोहूर्ले, संजय येनुरकर, पांडूभाऊ कंकलवार, मुन्ना कोटगले, मंगेश मगनुरवार, सुरेंद्र मडावी, जगदीश बांगरे, जनार्धन बोरकुटे, ईश्वर कोरडे, राजू पोटे, खुशाल पाटील शेरकी, ईश्वर सातपुते, धनराज गोहणे, नंदकिशोर घोंगडे, गौरव मांदाडे, श्री नामदेव गुरनूले माजी अध्यक्ष भाजपा, श्री प्रभाकरराव अंनतुलवार ज्येष्ट कार्यकर्ता भाजपा, श्री भिकारुजी शेंडे सरपंच ग्रामपंचायत मारोडा, श्री अनुप नेरलवार उपसरपंच, श्री बंडूभाऊ गेडाम सदस्य ग्रामपंचायत, रामुभाऊ उत्तरवार भाजपा कार्यकर्ता, संजय मेकर्तीवार अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, अर्चनाताई ऊईके सदस्या ग्रामपंचायत, दर्शनाताई मेश्राम सदस्या, सोनूताई मोहूर्ले सदस्या ग्रामपंचायत मारोडा, श्री. आनंद पाटील ठिकरे राजोली माजी सरपंच , श्री विवेक ठिकरे, श्री. बंडू नर्मलवर सरपंच उश्श्राला, तुषार ढोले उपसरपंच, उपस्थित होते..