राष्ट्रीय योग दिनानिमित्य केला योग्य प्रशिक्षकांचा सत्कार

35

राष्ट्रीय योग दिनानिमित्य केला योग्य प्रशिक्षकांचा सत्कार

मूल (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त स्थानिक तालुका क्रीडा संकुल येथे योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्राणायाम आणि योगाच्या सरावा नंतर तालुक्यात योग प्रशिक्षकाचे उत्तम कार्य करणारे योग प्रशिक्षक अनिल गांगरेडीवार व दिलीप मोकळे यांचा चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांचे हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपञ देवुन सत्कार करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर, नगर परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भाजपा शहराध्यक्ष प्रभाकर भोयर आदींसह अनेक योग साधक उपस्थित होते.

यावेळी निरोगी जीवन जगण्यासाठी मणुष्याने योगाचे धडे घ्यावे. असे मनोगत जि. प.अध्यक्ष संध्या गुरनुले आणि नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर यांनी व्यक्त केले.

 

अल्पोपहाराने योग दिनाची सांगता झाली.