कॅन्सरग्रस्त रुग्णाला शेतकरी कल्याण निधीने दिला आधार

33

मुल – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावर कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांना,शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम केले आहे. एवढेच नव्हे तर साप चावून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना, घर जळून बेघर झालेल्यांना व धानाचे पुंजने जळून आकस्मिक आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन रुग्णांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम बँक करीत असून मुल तालुक्यातील गांगलवाडी येथील अल्प भूधारक शेतकरी खुशाल काटकर यांना तोंडाला कँसर झाल्याने उपचारासाठी ४००००/-हजार रुपये मदतीचा चेक अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी दिला.तसेच गावातील युवकांनी नौकरीच्या मागे न लागता बचत गट स्थापन करुन बँकेकडून कर्ज घेऊन गावातच शेळ्या-मेंढ्या, कुकुड पालन, दुग्धव्यवसाय, किरकोळ व्यवसाय करावा असा सल्ला युवकांना संतोषशिंह रावत यांनी दिला. यावेळी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, माजी संचालक वामन चांभारे , गुरु गुरनुले, ग्राम पंचायत सदश कलाताई कंनाके, उमाजी चीचघरे,अनिल घोनमोडे, सचिन केवे, विनोद जेंगठे, शुभम चांभारे, धनराज सिडाम, कुमेश कोल्हे, तौशिप पठाण, कोमलताई केवे, यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.