अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी

67

चंद्रपूर :-राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती व जमाती प्रवगार्तील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. १४ एप्रिलपासून ते ६ डिसेंबर या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवगार्तील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थ्यांना या योजनेमधून घरगुती वीजजाडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५00 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यामध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. अनुसूचित जाती व जमातील प्रवगार्तील अर्जदारांनी नवीन वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिका?्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमुन्यातील अजार्सोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडण्यात यावे, वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूवीर्ची थकबाजी नसावी, तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अजार्सोबत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहिती महावितरणाच्या संकतेस्थळावर उपलब्ध आहे. एससी, एसटी प्रवगार्तील नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणाने केले आहे.