SBI ग्राहक सेवा केंद्र सुरु करा आणि बसल्या जागी हजारो रुपये कमवा

34

मुंबई: भारतीय स्टेट बँकेकडून आपल्या ग्राहकांना प्रत्यक्ष शाखा, ऑनलाईन आणि डिजिटल अ‍ॅप्लिकेशन अशा विविध माध्यमातून सेवा पुरवल्या जातात. आजघडीला एसबीआय (SBI) ही देशात सर्वाधिक शाखा असणाऱ्या बँकांपैकी एक आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी SBIकडून अनेक ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र (Custome Service Point) तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी तुम्हाला पैसे जमा करणे किंवा खाते उघडणे यासारख्या सेवा दिल्या जातात. (How to start SBI Bank Custome Service Point )

ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी अशाप्रकारची ग्राहक सेवा केंद्रे खूपच फायदेशीर ठरतात. कोणीही ग्राहक सेवा केंद्र सुरु करु शकतो. या माध्यमातून बऱ्यापैकी अर्थार्जनही होते. ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात.

ग्राहक सेवा केंद्र कोणती व्यक्ती चालवू शकते?

एसबीआय बँकेचे नियम आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कोणतीही व्यक्ती ग्राहक सेवा केंद्र सुरु करु शकते. ग्राहक सेवा केंद्र करण्यासाठी तुम्हाला प्रथम बँकेशी संपर्क करावा लागेल.

ग्राहक सेवा केंद्र कशाप्रकारे सुरु कराल?

SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयात (RBO) अर्ज सादर करावा लागतो. https://bank.sbi/portal/web/home/branch-locator या पोर्टवरुन तुमच्या परिसरातील RBO चा पत्ता मिळेल. याशिवाय, तुम्ही जवळच्या शाखेतूनही हा पत्ता मिळवू शकता. काही खासगी कंपन्यांच्या माध्यमातूनही SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मदत केली जाते. मात्र, काहीवेळा याठिकाणी फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या माहितीचा स्रोत नीटपणे तपासावा.