सोमनाथ देवस्‍थान परिसरात सभागृह बांधकामासाठी एक कोटी रु. निधी मंजुर. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित

33

 

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल तालुक्‍यातील सुप्रसिध्‍द सोमनाथ देवस्‍थान परिसरात सभागृहाच्‍या बांधकामासाठी १ कोटी रु. निधी मंजुर करण्‍यात आला आहे.

दि. १५ ऑगस्‍ट २०२१ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार मारोडा येथे ग्रामपंचायतीद्वारे आयोजित कार्यक्रमला गेले असता नागरिकांनी सोमनाथ येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्‍याची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांनी नागरिकांना त्‍यासंबंधाने आश्‍वासन देखील दिले. आ. मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी ग्रामविकास विभागाच्‍या दि. ३० मार्च २०२१ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये २५१५ या लेखाशिर्षा अंतर्गत सोमनाथ येथील सामाजिक सभागृहाच्‍या बांधकामासाठी १ कोटी रु. निधी मंजुर केला आहे.
श्री सोमनाथ मंदीर देवस्‍थान परिसर सौंदर्यीकरण व विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजुर व्‍हावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार प्रयत्‍नशील असुन याबाबत पर्यटन संचालनालयाशी त्‍यांचा पत्रव्‍यवहार व पाठपुरावा सुरु आहे. सोमनाथ देवस्‍थान परिसरात सभागृहाचे बांधकाम मंजुर झाल्‍यामुळे भाविकांसाठी मोठी सोय उपलब्‍ध झाल्‍याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.